योगेश बिडवई ।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करताना राज्यात १५ आॅक्टोबरपर्यंत तब्बल २८ कोटी ८३ लाखांची रोकड जप्त करण्यात आल्याची माहिती राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी ‘लोकमत’ला दिली.भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली राज्याचे मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय मतदान केंद्र पातळीपर्यंतच्या यंत्रणेमार्फत प्रभावी उपाययोजना राबवित असल्याचे शिंदे म्हणाले.रोकडसोबतच मद्य, अमली पदार्थ, सोने-चांदी आदींसह ८३ कोटी ५८ लाख रुपयांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे. राज्यात १५ आॅक्टोबरपर्यंत आचारसंहिता भंगाचे १,१५३ गुन्हे दाखल झाले आहेत. जिल्हास्तरावरून मुख्य कक्षाला रोज निवडणूक खर्चाचा अहवाल येत असतो, असेही शिंदे यांनी सांगितले.संवेदनशील मतदार संघांमध्ये पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. निवडणूक कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे.मतदार यंत्रांची सुरक्षितताफर्स्ट लेव्हल चेक करताना राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित असतात. प्रत्यक्ष स्ट्राँग रूममध्ये जाऊन सर्व यंत्रे दाखविले जातात. काही यंत्रांवर मॉक पोल घेऊन यंत्रांची व व्हीपॅटची चाचणी देखील करण्यात येते. माध्यमांसमोरही ही चाचणी करण्यात येते, असे ते म्हणाले.पारदर्शकतेला सर्वोच्च प्राधान्यमतदार यादी तयार करण्यापासून अंतिम करण्यापर्यंत तसेच मतदान यंत्रांची तपासणी, ते केंद्रांपर्यंत पोहोचविण्यापर्यंत राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना सहभागी करून घेण्यात येते. यंदा राजकीय पक्षांच्या एक लाखाहून अधिक बूथ लेव्हल एजंटची नियुक्ती केली होती. मतदान यादीची प्रसिद्धी, राजकीय पक्षांकडून त्यावर आक्षेप मागविण्यात आले होते.- दिलीप शिंदे,अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारीएकूण ८३ कोटी ५८ लाखांचा मुद्देमाल पथकाकडून जप्तरोकड जप्त : २८ कोटी ८३ लाखमद्य जप्त : १७ कोटी १0 लाखअमली पदार्थ जप्त : १७ कोटी ९९ लाखसोने-चांदी : १९ कोटी ६६ लाख