शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

अबब ! नागपूर विद्यापीठ चक्क अब्जाधीश

By admin | Published: June 12, 2017 8:55 PM

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील अनेक विभागांमध्ये सुविधांच्या नावाने बोंबच असते.

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 12 - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील अनेक विभागांमध्ये सुविधांच्या नावाने बोंबच असते. अगदी मुख्य प्रशासकीय इमारतीच्या परिसरात देखील आवश्यक त्या सुधारणा दिसून येत नाहीत. यासाठी विद्यापीठाकडून निधीचे कारण देण्यात येते. मात्र प्रत्यक्षात नागपूर विद्यापीठाकडे कोटी नव्हे तर अब्ज रुपयांच्या ठेवी आहेत. विशेष म्हणजे दरवर्षी यात वाढच होत चालली आहे. अशा स्थितीत विद्यार्थी हितासाठी निधी खर्च करण्यासाठी विद्यापीठ तात्काळ निर्णय का घेत नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.

उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत नागपूर विद्यापीठाकडे माहिती मागितली होती. नागपूर विद्यापीठाकडे किती जमीन आहे, जमिनीची बाजारभावानुसार किंमत किती आहे, विद्यापीठाच्या बँकांमध्ये विद्यापीठाच्या किती रुपयांच्या ठेवी आहेत, ठेवींवर विद्यापीठाला व्याज किती मिळते तसेच व्याजाचा उपयोग कशासाठी करण्यात येतो आणि विद्यापीठाला किती दान मिळाले, इत्यादी प्रश्न त्यांनी विचारले होते. प्राप्त झालेल्या माहितीनुसार २०१५-१६ या कालावधीत नागपूर विद्यापीठाकडे ५ अब्ज ५६ कोटी ३५ लाख ९ हजार ९०७ रुपयांच्या ठेवी होत्या. २०१२-१३ मध्ये हेच प्रमाण २ अब्ज ५ कोटी ८५ लाख ९३ हजार २५२ रुपये इतके होते. चार वर्षांच्या कालावधीत विद्यापीठांच्या ठेवींमध्ये ३ अब्ज ५० कोटी ४९ लाख १६ हजार ६५५ रुपयांची वाढ झाली. वाढीची टक्केवारी १७० टक्के इतकी होती. मात्र या प्रमाणात विद्यापीठात विकास झालेला दिसून आलेला नाही. परीक्षा विभागाचे संगणकीकरण आणि ‘आॅनलाईन’ व्यवस्था सुरू करण्यात आली. मात्र विविध विभाग, वसतिगृहे, कार्यालये यांच्यातील मूलभूत समस्या कायमच आहे. विद्यार्थ्यांना हक्काचे विद्यार्थी माहिती केंद्रदेखील उपलब्ध होऊ शकलेले नाही. ‘कॅम्पस’मध्ये अनेक सोयीसुविधांचा अभाव आहे. वसतिगृहांची अवस्थादेखील फारशी चांगली नाही. अशा स्थितीत या ठेवींचा उपयोगच काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. चार वर्षांत एक अब्जाहून अधिक व्याजनागपूर विद्यापीठाला दरवर्षी या ठेवींमधून मिळणाºया व्याजाचा आकडाच कोट्यवधी रुपयांत असतो. २०१२-१३ ते २०१५-१६ या कालावधीत नागपूर विद्यापीठाला व्याजापोटीच १ अब्ज ४ कोटी ७४ लाख ४६ हजार रुपयांची रक्कम मिळाली. २०१५-१६ मध्ये मिळालेला व्याजाचा आकडा ४३ कोटी ८५ लाख ३७ हजार इतका होता. व्याजाच्या रकमेची पुनर्गुंतवणूक करण्यात येते, असे उत्तर विद्यापीठातर्फे देण्यात आले आहे. मात्र हीच रक्कम विद्यार्थ्यांच्या हितासाठी लावली तर विद्यापीठाचा दर्जा नक्कीच सुधारू शकतो.पावणेसाठ लाखांचे दाननागपूर विद्यापीठाला दान देणा-यांचे प्रमाणदेखील बरेच आहे. २०१२ ते २०१६ या कालावधीत नागपूर विद्यापीठाला ५९ लाख ७५ हजार रुपयांचे दान प्राप्त झाले. २०१३-१४ मध्ये सर्वाधिक २८ लाख ५० हजारांचे दान मिळाले.विद्यापीठातील वर्षनिहाय ठेवी

वर्षठेवीव्याज

२०१२-१३२,०५,८५,९३,२५२१३,५५,८९,०००

२०१३-१४३,७८,७८,२७,८४५११,४६,२९,०००

२०१४-१५४,७५,२५,०७,७२४३५,८६,९१,०००

२०१५-१६५,५६,३५,०९,९०७४३,८५,३७,०००

प्राप्त झालेले दान

वर्षदाननिधी

२०१२-१३१४,००,०००

२०१३-१४२८,५०,०००

२०१४-१५११,७५,०००

 

२०१५-१६५,५०,०००