मुंबई : राज्यात सरसकट टोलमाफी करता येणार नाही. २०० कोटींवरील रस्त्यावर मोठ्या वाहनांना टोल आकारण्याची तरतूद नवीन टोल धोरणात केली असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेत दिली. शरद रणपिसे यांनी याबाबत तारांकित प्रश्न विचारला होता. टोलमुक्तीची घोषणा करणाऱ्या भाजपाचा कारभार फसवाफसवीचा असल्याची टीका रणपिसे यांनी केली. यावर बोलताना पाटील म्हणाले, ‘विकासकाला प्रकल्प खर्च, खर्चावरील १२ टक्के व्याज आणि १५ टक्के नफा टोलच्या माध्यमातून वसूल झाल्यानंतर, टोलनाक्यावर ९०:१० फॉर्म्युला राबवण्यात येईल. ज्यायोगे टोलामधील ९० टक्के रक्कम सरकारला, तर १० टक्के रक्कम देखभाल खर्चापोटी विकासकाच्या वाट्यास येणार आहे.’
संपूर्ण टोलमाफी अशक्य - पाटील
By admin | Published: April 01, 2016 1:40 AM