शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
2
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
3
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
4
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
6
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
7
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
8
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
9
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
10
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
11
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
12
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
13
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
14
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
15
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
16
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
17
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
18
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
19
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
20
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव

अबू आझमींच्या भाच्याला 10 दिवसांची पोलिस कोठडी

By admin | Published: June 08, 2017 8:19 PM

समाजवादी पार्टीचे नेते अबू अजमी यांच्या भाच्याला दिल्ली कोर्टाने १० दिवासांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि, ८ - समाजवादी पार्टीचे नेते अबू अजमी यांच्या भाच्याला दिल्ली कोर्टाने १० दिवासांची पोलिस कोठडी सुनावली आहे. आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्करीमध्ये त्याचा सहभाग असल्याचा दिल्ली पोलिसांचा दावा आहे. दिल्ली पोलिसांच्या ह्यस्पेशल सेलह्णने मंगळवारी अबू असलम कासिम नामक तरुणाला वाकोल्यातील पंचतारांकित हॉटेलमधील एका रूममधून अटक केली होती. वाकोल्याच्या ग्रँड हयात या पंचतारांकित हॉटेलमध्ये कासिम लपल्याची माहिती दिल्लीच्या स्पेशल सेलचे पोलीस उपायुक्त संजीव यादव यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांच्या पथकाने या हॉटेलमधून कासिमला अटक केली. या ठिकाणी तो त्याच्या मैत्रिणीसोबत आला होता. रात्री साडेदहाच्या सुमारास त्याला ताब्यात घेण्यात आल्याचे वाकोला पोलिसांकडून सांगण्यात आले. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी दिल्लीमध्ये एका ठिकाणी धाड टाकत अमलीपदार्थांचा मोठा साठा हस्तगत करण्यात आला. ज्याची किंमत सुमारे चाळीस कोटी रुपये आहे. या प्रकरणी तिघांना दिल्ली पोलिसांनी अटक करत त्यांची चौकशी सुरू केली. हे अमलीपदार्थ कासिमनेच त्यांना पुरविले असून, अमलीपदार्थांचा तो देशातील मोठा तस्कर असल्याचेही ते म्हणाले. तेव्हापासून दिल्ली पोलिसांची कासिमवर नजर होती. समुद्रमार्गे अमलीपदार्थांची तस्करी तो करत होता. दुबईमध्ये असलेल्या कैलाश राजपूत नामक इसमाचेही नाव या प्रकरणी पुढे आले आहे. राजपूत दुबईतून अमलीपदार्थ कासिमला पुरवत होता. कासिमनंतर मुंबई, दिल्ली तसेच अनेक मोठ्या शहरांमध्ये त्याचा पुरवठा करत असल्याचेही तपासात उघड झाले आहे.