ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १६ - मुंबईतील बहुचर्चित प्रदीप जैन हत्याकांडप्रकरणी टाडा कोर्टाने सोमवारी निकाल दिला असून कोर्टाने कुख्यात गँगस्टर अबू सालेमला दोषी ठरवले आहे. टाडा कोर्टाच्या या निकालामुळे सध्या तुरुंगात असलेल्या अबू सालेमभोवती कायद्याचा फास आणखी आवळला आहे.
७ मार्च १९९५ मध्ये मुंबईतील जुहू येथे बांधकाम व्यावसायिक प्रदीप जैन यांची हत्या करण्यात आली होती. जागेच्या वादातून अबू सालेमने ही हत्या घडवल्याचे समोर आले होते. याप्रकरणी अबू सालेम, मेहदी हसम आणि बिल्डर विरेंद्र झांब यांच्याविरोधात खटला सुरु होता. सोमवारी टाडा कोर्टाने याप्रकरणाचा निकाल दिला. कोर्टाने दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यावर अबू सालेमला दोषी ठरवले. या प्रकरणातील शिक्षेचा निर्णय कधी दिला जाईल हे अद्याप समजू शकलेले नाही.