मुंबई : उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत नाशिक येथे नव्याने सुरू करण्यात आलेल्या भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्रातील प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाली आहे. या केंद्रातील प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा (सीईटी) देणे आवश्यक असून, विद्यार्थ्यांना ०७ आॅक्टोबरपर्यंत संकेतस्थळावर प्रवेश अर्ज भरता येणार आहे. अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची सीईटी परीक्षा २३ नोव्हेंबर रोजी घेण्यात येणार आहे.परीक्षेतील गुणवत्तेनुसार ६० विद्यार्थ्यांना व अनुसूचित जाती बार्टीद्वारा १० विद्यार्थ्यांना राज्य शासनाच्या प्रचलित आरक्षणानुसार प्रवेश देण्यात येईल. प्रवेशित विद्यार्थ्यांची यूपीएससी-२०१५ पूर्व परीक्षेची तयारी करून घेण्यात येणार आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या २०१५ च्या परीक्षेसाठी पात्रताधारक कोणत्याही पदवी धारकास ही प्रवेश परीक्षा देता येईल. आॅनलाइन प्रवेश अर्ज भरल्यानंतर २३ नोव्हेंबर रोजी सीईटी परीक्षा घेण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांची निवड झाल्यानंतर प्रशिक्षणाची प्रक्रिया १ जानेवारी २०१५ पासून सुरू होणार आहे. विद्यार्थ्यांना ६६६.्रं२ल्लं२ँ्र‘.ङ्म१ॅ.्रल्ल या संकेतस्थळावर ०७ आॅक्टोबरपर्यंत आॅनलाइन प्रवेश अर्ज भरता येईल. प्री-आयएएस ट्रेनिंग सेंटरमुळे भारतीय प्रशासकीय सेवेत अधिकारी होणाच्या संख्येत वाढ होणार आहे.
प्री-आयएएस सेंटरचे प्रवेश सुरू
By admin | Published: September 23, 2014 5:19 AM