शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या एक दिवस आधीच ठाकरे गटाला धक्का; डोंबिवलीतील नाराजीचा शिंदे गटाला फायदा
2
Maharashtra Election 2024: ‘या’ मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार लढवत नाहीये निवडणूक! काय आहेत कारणे?
3
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
4
"...अन्यथा माझा बाबा सिद्दिकी व्हायला वेळ लागणार नाही", शरद पवार गटाच्या रमेश कदमांना जीवे मारण्याची धमकी 
5
नीरव मोदी-विजय माल्ल्यावर कारवाई होणार! PM मोदींनी ब्रिटनसमोर उपस्थित केला मुद्दा
6
ऐन निवडणुकीत पक्षाकडून निलंबन; सांगता सभेत शरद पवारांबद्दल काय म्हणाले राहुल जगताप?
7
"...तर उद्धव ठाकरे यांच्यावर FIR का दाखल होत नाही? त्यांना आत का टाकत नाही?"; रामदास कदम यांचा सवाल
8
मराठी-हिंदी गाणी गाणाऱ्या प्रसिद्ध गायकाने गमावलेला आवाज, २ वर्षांनी केला खुलासा
9
या सगळ्या अफवा! असित मोदींसोबतच्या भांडणावर जेठालालचं स्पष्टीकरण, म्हणाले- "मी हा शो सोडत नाहीये..."
10
कश्मिरा शाहचा अपघात नक्की कसा झाला? नणंद आरती सिंहने दिली माहिती; म्हणाली, "मॉलमध्ये..."
11
Mohammed Shami च्या फिटनेस टेस्टसाठी BCCI नं सेट केला नवा पेपर
12
'हे' ७ फॉर्म्युले डोक्यात फिट करा, कमाईसोबतच तुमचा पैसाही वाढेल; लोकही विचारतील, "हे कसं केलं?"
13
मोदी-ठाकरे-पवार-शिंदेंनी मैदान गाजवलं; सोलापुरात कुठे कोणत्या नेत्याच्या सभा झाल्या? जाणून घ्या
14
27000 सैनिक तैनात, अनेक जिल्ह्यात कर्फ्यू, इंटरनेट बंद; मणिपूरमध्ये नेमकं काय घडतंय?
15
भयानक! समुद्रकिनारी बसलेल्या माय-लेकी, अचानक लाट आली अन्...; थरकाप उडवणारा Video
16
विशेष मुलाखत: "संविधानाचे संरक्षण व्हावे यासाठीच आम्ही महायुतीसोबत"
17
Defence Stocks : HAL सह 'या' ३ स्टॉक्सवर ब्रोकरेज बुलिश, ९५ टक्क्यांपर्यंत देऊ शकतात रिटर्न
18
महाराष्ट्राचं सरकार हे दिल्लीतून चालतंय, सुप्रिया सुळेंचा आरोप 
19
Maharashtra Election 2024 Live Updates: युगेंद्र यांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम, बारामतीमध्ये खळबळ
20
अनिल देशमुखांवरील हल्ला हे रचलेले कुंभाड; भाजपाचा संशय, आजच सखोल चौकशी करण्याची मागणी

साताऱ्याच्या Hirkani Riders Groupच्या Shubhangi Pawar यांचा अपघाती मृत्यू, मोहीम अर्धवट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2021 11:19 AM

Hirkani Riders Group: साडेतीन शक्तिपीठांचे दर्शन घेण्यासाठी निघालेल्या सातारा येथील हिरकणी बाईक रायडर्सच्या ग्रुपमधील शुभांगी संभाजी पवार (३२) ( Shubhangi Pawar) यांचा अर्धापूर तालुक्यातील भोकर फाटा येेथे मंगळवारी सकाळी टँकरच्या मागील चाकाखाली येऊन दुर्दैवी मृत्यू झाला.

अर्धापूर (जि. नांदेड) : साडेतीन शक्तिपीठांचे दर्शन घेण्यासाठी निघालेल्या सातारा येथील हिरकणी बाईक रायडर्सच्या ग्रुपमधील शुभांगी संभाजी पवार (३२) यांचा अर्धापूर तालुक्यातील भोकर फाटा येेथे मंगळवारी सकाळी टँकरच्या मागील चाकाखाली येऊन दुर्दैवी मृत्यू झाला. खराब रस्त्यामुळे त्यांची बाईक स्लीप होऊन टँकर डोक्यावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.कोल्हापूर येथील महालक्ष्मी व तुळजापूर येथे भवानी मातेचे दर्शन घेऊन हा ग्रुप नांदेड येथून माहूर, वाशी, औरंगाबाद, नाशिक, वणी व पुन्हा सातारा, असा जाणार होता. मंगळवारी सकाळी सचखंड गुरुद्वारा येथे दर्शन घेतल्यानंतर या सर्वजणी माहूरला जाण्यासाठी निघाल्या.  हा ग्रुप भोकर फाटा येथे असताना शुभांगी पवार यांची बाईक खराब रस्त्यामुळे स्लीप होऊन त्या रस्त्यावर कोसळल्या. त्यांच्या डोक्यावरून टँकरचे (जी.जे. १२ए.टी.-६९५७) चाक गेले. यात त्यांचा जागीच अंत झाला. नांदेडच्या डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात त्यांचे शवविच्छेदन होऊन  मृतदेह साताराकडे रवाना करण्यात आला. 

मोहिमेद्वारे होणार होता महिला सबलीकरणाचा प्रसार- हिरकणी बाईक रायडर ग्रुपच्यावतीने साडेतीन शक्तिपीठ दर्शन ही मोहीम हाती घेण्यात आली होती. या मोहिमेत ब्रेस्ट कॅन्सर, रस्ते सुरक्षा जनजागृती, महिला सबलीकरणाचा प्रचार आणि प्रसार केला जाणार होता. - हा ग्रुप १० जिल्हे व १४ तालुक्यांतून जाणार होता. या मोहिमेत शुभांगी पवार, मनीषा फरांदे, अंजली शिंदे, मोना निकम जगताप, अर्चना कुकडे, ज्योती दुबे, केतकी चव्हाण, भाग्यश्री केळकर, श्रावणी बॅनर्जी, ऊर्मिला भोजने यांचा समावेश होता. ९ महिला सदस्या १० ऑक्टोबर रोजी १ हजार ६६८ किमी प्रवासासाठी बाईकने निघाल्या. त्यांना सातारा येथे खासदार उदयनराजे व अनेक टीव्ही सेलिब्रिटींनी शुभेच्छा दिल्या होत्या. 

सध्या नांदेड महामार्गाचे काम सुरू आहे. संबंधित गुत्तेदारांनी एका बाजूच्या रस्त्याची दुरुस्ती न करता काम सुरू केले. या अपघाताला गुत्तेदाराची निष्काळजी कारणीभूत आहे. त्यामुळे गुत्तेदाराविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी ओबीसी हक्क परिषदेचे प्रदेश महासचिव सखाराम क्षीरसागर यांनी केले आहे.  

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रAccidentअपघात