राज चिंचणकर
नाटकांचे दौरे, चित्रपटांची शूटिंग्ज यासाठी करावा लागणारा वेळीअवेळी प्रवास, दगदग, धावपळ, दिलेल्या वेळा पाळण्यासाठी करावी लागणारी कसरत या सगळय़ाचा एकत्रित परिणाम कलावंतांच्या दिनक्रमावर होत असतो. याचा थेट संबंध कलावंतांच्या आरोग्याशी येतो आणि काही वेळा हा हलगर्जीपणा जिवावरही बेततो. मराठी नाटय़ व चित्रपटसृष्टीतील काही महत्त्वाचे कलावंत अशाच प्रकारे मृत्यूच्या दाढेत ओढले गेल्याची उदाहरणो ताजी आहेत.
कलावंतांच्या अपघातांचा सिलसिला सामोर आला तो 198क् मध्ये! ज्येष्ठ कलावंत जयराम हर्डीकर व शांता जोग यांना त्या वर्षी अपघातातून काळाने हिरावून नेले आणि कलावंतांच्या अपघाती मृत्यूची चर्चा सुरू झाली. त्यानंतर अवघ्या चार वर्षातच अरुण सरनाईक अपघाताचे कारण होऊन काळाच्या पडद्याआड गेले. लाडका कलावंत अपघाताचे निमित्त होऊन अंतर्धान पावतो. यावर भल्याभल्यांना विश्वास ठेवणो कठीण गेले. 21 जून 1994 रोजी ते ‘पंढरीची वारी’ या चित्रपटाचे चित्रीकरण संपवून टॅक्सीने पुण्याहून कोल्हापूरला चालले होते. पुणो - कोल्हापूर मार्गावरच त्यांच्या गाडीला अपघात झाला आणि अरुण सरनाईक नावाचा रसिकप्रिय अभिनेता काळाने हिरावून नेला.
मराठी चित्रपटसृष्टीतला एक काळ गाजवणारी रंजना देशमुख या अभिनेत्रीला अपघातात अपंगत्व आले. 1987 मध्ये ‘झुंजार’च्या चित्रीकरणासाठी तेव्हाच्या बंगलोरला जाताना मोटार अपघातात त्या कायमच्या अपंग झाल्या. पायच निकामी झाल्याने तिची चित्रपट कारकीर्दच अकस्मात संपुष्टात आली.
दूरदर्शनवरून बातम्या सांगणारा गोड चेहरा व मधाळ आवाज यांचा संगम असलेली तसेच नाटय़सृष्टीत अभिनयाचे खणखणीत नाणो वाजवत ‘ती फुलराणी’ म्हणून अजरामर झालेल्या भक्ती बर्वे यांना पुणो-मुंबई द्रुतगती मार्गावर अपघात झाला आणि प्रत्येकाच्या मनाचा बांध फुटला. 11 फेब्रुवारी 2क्क्1 रोजी पुणो-मुंबई द्रुतगती मार्गावरील दिव्याच्या खांबावर त्यांची गाडी आदळली आणि भक्ती बर्वे नावाचे पर्व अचानक काळाच्या उदरात गडप झाले.
अगदी अलीकडेच म्हणावा असा अपघात दोन वर्षापूर्वी मुंबई-पुणो द्रुतगती मार्गावर झाला होता. 24 डिसेंबर 2क्12 रोजी आनंद अभ्यंकर आणि अक्षय पेंडसे या जोडगोळीने अचानक घेतलेला निरोप चटका लावणारा ठरला. हे दोघे ‘वॅगन आर’मधून या मार्गावरून प्रवास करीत
असताना चालकाचा ताबा सुटलेला एक टेम्पो त्यांचा काळ बनून त्यांना सामोर आला आणि एका क्षणात होत्याचे नव्हते झाले. उर्स टोल चेकपोस्टजवळ घडलेल्या या अपघाताने मराठी सिनेसृष्टी व मालिकेच्या विश्वातले दोन आघाडीचे मोहरे हरपले. वाढलेली आणि वाढवून घेतलेली कामे, शूटिंग्जची शेडय़ुल्स या सगळय़ांमुळे आजही बरेचसे कलावंत ‘चलता हैं’ या भूमिकेतून वेळीअवेळी प्रवास करीतच आहेत. अर्थात, अपघाताला निमंत्रण नको म्हणून योग्य ती खबरदारी घेतली जाते. असा काही नियम नाही आणि याबाबतीत तशी ती होऊही नये, असेच तमाम मायबाप रसिकांचे या कलावंतांना सांगणो आहे.