राकेश घानोडेनागपूर : समाजामध्ये संबंधित परंपरा नसल्यास हिंदू विवाह कायद्यानुसार मामा व भाचीचे लग्नच होऊ शकत नाही. लग्नाकरिता हे प्रतिबंधित नाते आहे, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती गोविंद सानप यांनी एका प्रकरणात दिला.
बुलडाणा जिल्ह्यातील भाची सविता (३८) हिने मामा अमरदास (५६) याच्यासोबत लग्न झाल्याचा दावा करून पोटगी मागितली होती. तिची मागणी नामंजूर करण्यात आली. हिंदू विवाह कायद्यातील कलम ५ (४) अनुसार समाजामध्ये परंपरा नसल्यास प्रतिबंधित नात्यामध्ये लग्न होऊ शकत नाही.
मामा-भाचीचे नाते लग्नाकरिता प्रतिबंधित आहे. तसेच, कलम ५ (१) अनुसार एक लग्न कायम असताना दुसरे लग्न करता येत नाही. सविताने अमरदाससोबत लग्न केले त्यावेळी त्याचे आधीचे लग्न कायम होते. त्यामुळे या दोन्ही तरतुदींनुसार सविता व अमरदास यांचे लग्न सुरुवातीपासूनच अवैध ठरते. करिता, अमरदास सविताला पोटगी देण्यास जबाबदार नाही, असे या निर्णयात स्पष्ट करण्यात आले.
अपील फेटाळले अन्...सविताने पोटगीसाठी प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयात अर्ज केला होता, मात्र तो अर्ज नामंजूर करण्यात आला. त्यामुळे सत्र न्यायालयात अपील दाखल केले होते, तेही फेटाळाल्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
नेमके झाले काय?nचुलत बहीण कविताचे अमरदाससोबत लग्न केले गेले.nकविता लहान असल्याने तिची सासरी पाठविणी झाली नाही. त्याचा फायदा घेत अमरदासने करिनासोबत लग्न केले.n त्यामुळे कविता व अमरदासचा घटस्फोट करण्यात आला. त्यानंतर दबावाने सविताचे अमरदाससोबत लग्न लावण्यात आले. त्यावेळी अमरदास व करिनाचे लग्न कायम होते. एका आजारामुळे सविताला सासरच्या घराबाहेर काढण्यात आले. परिणामी, ती माहेरी गेली.