नागपूर : मुंबईतील कुख्यात डॉन अरुण गवळी याला नागपूर खंडपीठाने बुधवारी २८ दिवसांची संचित रजा मंजूर केली. त्याला दोन आठवड्यांत सोडण्याचे निर्देश शासनाला दिले. न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व विनय देशपांडे यांनी हा निर्णय दिला.गवळीने संचित रजेसाठी सुरुवातीला कारागृह उपमहानिरीक्षकाकडे अर्ज केला होता. त्या वेळी निवडणुकीचे दिवस असल्याने त्याचा अर्ज फेटाळण्यात आला होता. या निर्णयाला गवळीने उच्च न्यायालयात आव्हान दिले. गवळीला शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसांदेकर यांच्या हत्याप्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. या शिक्षेविरुद्ध त्याने मुंबई उच्च न्यायालयात अपील दाखल केले असून, ते अपील प्रलंबित आहे. गवळीला २० मे २००८ रोजी अटक करण्यात आली होती. सध्या त्याला नागपूर मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
कुख्यात गुंड अरुण गवळीला संचित रजा
By admin | Published: April 27, 2017 1:42 AM