लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : पीक विम्यासाठी प्राप्त झालेल्या माहितीची छाननी करण्यासाठी यंत्रणा उपलब्ध नसल्याने काही व्यक्ती त्याचा गैरफायदा घेत आहेत. मात्र, या प्रक्रियेत अचूकता आणण्यासाठी शासनाकडून विविध स्तरावर प्रयत्न केले जात आहेत, असे कृषी विभागाचे प्रधानसचिव विजयकुमार यांनी सांगितले.लहरी हवामानाचा विचार करून शेतकऱ्यांनी पिकांचा विमा उतरविणे आवश्यक आहे. योग्य शेतकऱ्यांनाच पीक विम्यांचा लाभ मिळावा, यासाठी शासनाकडून पीक विमा प्रक्रियेत अचूकता आणण्यावर भर दिला जात आहे, असे त्यांनी सांगितले. आधार क्रमांक बँकेशी लिंक केल्यामुळे एकापेक्षा अधिकवेळा अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांची माहिती समजू शकेल. राज्यात सध्या दुबार पेरणीचे संकट दिसत नाही. जत, तासगावमधील काही भागांत अद्याप पाऊस झालेला नाही, असे ते म्हणाले.
‘पीक विमा प्रक्रियेत येणार अचूकता’
By admin | Published: July 17, 2017 3:15 AM