शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकहिताचा निर्णय रद्द कराल, तर तुमचाच करेक्ट कार्यक्रम होईल; CM शिंदे यांचा विरोधकांना इशारा
2
Video - भयंकर! नायजेरियात पेट्रोलचा टँकर उलटल्याने भीषण अपघात; १४७ जणांचा मृत्यू
3
आजचे राशीभविष्य: ६ राशींना धनलाभ, येणी वसूल होतील; मन प्रसन्न होईल, शुभ फलदायी दिवस
4
संभाव्य बंडाळी टाळण्यासाठी भाजपची आधीच डॅमेज कंट्रोल मोहीम; तीन आघाड्यांवर राबवताहेत मोहीम
5
आतापर्यंत 1,658 महिला लढल्या, पण विजयी झाल्या फक्त 161
6
विधानसभा जिंकू आणि सत्ता आणू : राज ठाकरे
7
महायुती सरकारचे विकासाचे दावे खोटे; नाना पटोलेंची टीका
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांची दिवाळी, महागाई भत्ता ३% वाढला
9
जीआरमुळे आचारसंहिता भंग झाली का, ‘व्होट जिहाद’ शब्दही तपासणार - चोक्कलिंगम 
10
न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी काढली; हातात तलवारीऐवजी संविधान!
11
काँग्रेसची ६० नावे निश्चित! छाननी समितीची दिल्लीत चर्चा; २० तारखेनंतर येणार पहिली यादी
12
शेतकऱ्यांना माेठा दिलासा, सरकारने वाढविले दर; गव्हाच्या एमएसपीमध्ये १५० रुपये वाढ
13
"जयंत पाटलांमध्ये महाराष्ट्र सांभाळण्याची..."; शरद पवारांचे सूचक विधान, नेमकी चर्चा काय?
14
VBA Candidate List 2024: आंबेडकरांनी 30 उमेदवारांची केली घोषणा; आदित्य ठाकरेंविरोधात कोण?
15
"मुख्यमंत्री होण्यासाठी लय उठाबशा काढाव्या लागतात"; जयंत पाटलांची कार्यकर्त्याला तंबी
16
नागपूर : न केलेल्या गुन्ह्यात १९ दिवस गेला कारागृहात अन्...; पोलिसांच्या चुकीची भोगतोय शिक्षा
17
विधानसभा निवडणूक लढणार की नाही? बावनकुळेंचं उमेदवारीबद्दल पहिल्यांदाच भाष्य
18
श्याम मानव यांच्या कार्यक्रमात भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ, नक्की काय घडलं?
19
'ट्रूडोंसोबत माझे थेट संबंध, मीच भारतविरोधी माहिती पुरवली', खालिस्तानी पन्नूचा मोठा खुलासा

अजित पवार यांच्यासह ७६ जणांवर आरोप

By admin | Published: September 16, 2015 12:09 AM

राज्य सहकारी बँकेमध्ये झालेल्या तब्बल १ हजार ८६ कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणी ७६ जणांना दोषारोपपत्र पाठविण्यात आले असून, यामध्ये माजी उपमुख्यमंत्री अजित पवार

नवी मुंबई : राज्य सहकारी बँकेमध्ये झालेल्या तब्बल १ हजार ८६ कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणी ७६ जणांना दोषारोपपत्र पाठविण्यात आले असून, यामध्ये माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विजयसिंह मोहिते-पाटील, दिलीप देशमुख, पांडुरंग फुंडकर यांच्यासह अनेक सर्वपक्षीय दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. २८ सप्टेंबरपासून या दोषारोपपत्रावर सुनावणी सुरू होणार आहे. संबंधितांचे आरोपांविषयी स्पष्टीकरण व पुरावे पाहून अंतिम जबाबदारी निश्चित केली जाणार आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेमध्ये २००८ ते २०१३ या पाच वर्षांमध्ये तत्कालीन संचालक मंडळाने साखर कारखाने व सूत गिरण्यांना नियमबाह्य कर्जवाटप करून बँक १ हजार ८६ कोटींच्या तोट्यात आणली. या अनियमिततेची दखल घेत रिझर्व्ह बँकेने तत्कालीन संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकाची नियुक्ती केली. तर या आर्थिक अनियमिततेची चौकशी करण्यासाठी शासनाने मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव शिवाजी पहिनकर यांची जून २०१४मध्ये नियुक्ती केली होती.पहिनकर यांनी तब्बल १५ महिने सर्व व्यवहारांची चौकशी केली. साखर कारखाने व इतर अनेक सहकारी संस्थांना झालेले विनातारण कर्जवाटप आणि नियम डावलून घेण्यात आलेले निर्णय, चौकशीअंती समोर आले. यावर संचालक मंडळाच्या बैठकीत आमच्यापुढे जी विषयपत्रिका आली त्यावर आम्ही निर्णय घेतले, असे स्पष्टीकरण दिले गेले; परंतु ते ग्राह्य धरण्यात आले नाही. यामुळे पहिनकर यांनी तत्कालीन संचालक आणि अधिकाऱ्यांसह ७६ जणांवर १४१ पानांचे दोषारोप निश्चित केले आहेत. १० सप्टेंबरला हे दोषारोपपत्र सर्व संचालकांना पाठविण्यात आले आहे. आरोपांविषयी स्पष्टीकरण देण्यासाठी २८ सप्टेंबरपासून सुनावणी सुरू होणार आहे. सर्व ७७ जणांना त्यांच्यावरील आरोपांविषयी स्पष्टीकरण व पुरावे देण्याची संधी दिली जाणार आहे. त्यांनी दिलेल्या पुराव्यानंतर अंतिम जबाबदारी निश्चित केली जाणार आहे. ज्यांच्यावर अंतिम जबाबदारी निश्चित होईल त्यांच्याकडून नुकसान झालेली रक्कम वसूल करण्याची कारवाई करण्यात येईल. मिळालेल्या माहितीप्रमाणे, या सुनावणीसाठी ६ महिने ते १ वर्षाचा कालावधी लागू शकतो. सद्य:स्थितीमध्ये तर सर्व ज्येष्ठ नेत्यांच्या अडचणी वाढल्या असून, ते आरोपांमधून बाहेर पडण्यासाठी काय पुरावे देणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. (प्रतिनिधी)यांच्यावर आहेत आरोपराष्ट्रवादी : अजित पवार, विजयसिंह मोहिते : पाटील, दिलीप सोपाल, अमरसिंह पंडित, माणिकराव पाटील, ईश्वरलाल जैन, राजेंद्र जैन, यशवंतराव गडाख, हसन मुश्रीफ, राजवर्धन कदमबांडे, राजेंद्र शिंगणे, गुलाबराव शेळकेकाँग्रेस : मदन पाटील, दिलीपराव देशमुख, विजय वडेट्टिवार, माणिकराव कोकाटे, रामप्रसाद बोर्डिकर, रजनी पाटील, जयवंतराव आवाळे, मधुकर चव्हाणशिवसेना : आनंदराव अडसूळभाजपा : पांडुरंग फुंडकरशेकाप : जयंत पाटील, मीनाक्षी पाटील