पारनेर (अहमदनगर) : चोरी व मारहाण प्रकरणात पारनेर पोलिसांच्या ताब्यात असलेल्या आरोपी महिलेने एका पोलीस कर्मचाऱ्याने अत्याचार केल्याची तक्रार प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांकडे केली आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे़तिखोल येथे एका वृद्ध महिलेवर हल्ला करून दागिन्यांची व पैशांची चोरी केल्याप्रकरणी पारनेर पोलिसांनी या आरोपी महिलेसह तिच्या दोन सहकाऱ्यांना हिंगोली जिल्ह्यातील चोंढी येथून काही दिवसांपूर्वी अटक केली होती़ त्यानंतर या महिलेला पारनेर उपकारागृहात ठेवण्यात आले होते. १० डिसेंबरच्या मध्यरात्री व ३० डिसेंबर २०१६ रोजी पहाटे तीन वाजता एका शेंडीवाल्या पोलिसाने तुरुंगाबाहेर काढून अत्याचार केल्याचे या महिलेने न्यायालयात सांगितले़ न्यायालयाने या घटनेची चौकशी करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले. त्यानंतर अधीक्षकांनी पारनेर येथे चौकशी पथक पाठवून संबंधित महिलेच्या फिर्यादीनुसार पारनेर पोलीस ठाण्यातील शेंडीवाल्या (पूर्ण नाव फिर्यादीत आलेले नाही) पोलीस कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे़ (प्रतिनिधी)> फुटेजचा आधारपारनेर येथील तुरुंगामध्ये सीसीटीव्ही बसवण्यात आहेत. तेथील फुटेज पाहून यातील तथ्य उघड होणार आहे. साहाय्यक पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांच्याकडे याचा तपास असून, त्यांनी सर्व फुटेज ताब्यात घेतल्याचे कळते.
पोलिसाने अत्याचार केल्याचा आरोपी महिलेचा आरोप
By admin | Published: January 19, 2017 5:17 AM