शहरं
Join us  
Trending Stories
1
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
2
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
3
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
4
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
6
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
7
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
8
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
9
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
10
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
11
'पथेर पांचाली'मधील 'दुर्गा' काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेत्री उमा दासगुप्ता यांचं निधन
12
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
13
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
14
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
15
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
16
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
17
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
18
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
19
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
20
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...

खून प्रकरणातील आरोपींचे पोलीस कोठडीतून पलायन

By admin | Published: April 09, 2017 1:21 PM

टोळीचे वर्चस्व सिद्ध करण्याच्या उद्देशाने योगीराज शिवराज खंडागळे याचा 12 दिवसांपूर्वी खून झाला.

ऑनलाइन लोकमतपिंपरी, दि. 9 - टोळीचे वर्चस्व सिद्ध करण्याच्या उद्देशाने योगीराज शिवराज खंडागळे याचा 12 दिवसांपूर्वी खून झाला. या प्रकरणातील सात आरोपींना 3 एप्रिलला खडकी पोलिसांनी गुलबर्गा, कर्नाटक येथून अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता, 10 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली होती. उद्या कोठडीची मुदत संपणार होती, मात्र 9 एप्रिलला पहाटे दोन आरोपींनी खिडकीचे गज वाकवून, तारेची जाळी उचकटून कोठडीतून पलायन केले. खडकी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पलायन केलेल्या आरोपींमध्ये सिराज अल्लाद्दीन अमीर कुरेशी (वय 40, रा. खडकी), सनी विजय अ‍ॅन्डी (वय 25, धानोरी विश्रांतवाडी) या दोन आरोपींचा समावेश आहे. पोलिसांनी या दोन आरोपींसह सनी ज्ञानेश्वर तायडे, योगेश ऊर्फ बालसुब्रह्मण्यम पिल्ले, रॉकी ऊर्फ डम्पी फ्रान्सिस मोती, आकाश दत्ता चांदणे, प्रकाश लिंग्या राठोड, आरिफ रियाज घोडेस्वार यांना 3 एप्रिलला पोलीस कोठडीत ठेवले होते. त्यांच्याबरोबरच्या 6 अल्पवयीन मुलांनाही ताब्यात घेण्यात आले होते. या आरोपींपैकी दोन जण पोलिसांना गुंगारा देऊन पसार झाले. खडकी पोलीस ठाण्यात कर्तव्य बजावणारे पोलीस अधिकारी बाजीराव चिमन ठोंबरे यांनी या घटनेची फिर्याद नोंदवली आहे. आरोपी पळून गेल्याने संबंधित पोलीस कर्मचारी, अधिकाऱ्यांवर कारवाई होण्याची शक्यता आहे. खडकी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास भोसले या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.