मुंबई : आमदारांना अश्लील मेसेज पाठविल्याप्रकरणी विलेपार्ले पोलिसांनी जळगावच्या दीपककुमार गुप्ता (४०) याला अटक करून आठवडा उलटला तरी त्याच्याकडून अश्लील मेसेज पाठविण्यामागचे गूढ उकलण्यास पोलिसांना यश आलेले नाही. गुप्ताने तो मी नव्हेचची भूमिका घेतल्याने पोलिसांना तपासात अडचणी निर्माण होत आहेत. मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, धुळे, जळगाव, नाशिक येथील आमदारांच्या धमकी प्रकरणात गुप्ताचा संबंध असल्याचे तपासात समोर आले. धुळ्यातील आमदार अनिल गोटे आणि कुणाल पाटील यांना मेसेज पाठविल्याप्रकरणी २०१५ मध्ये त्याला अटक झाली होती. तेव्हाही त्याने पोलिसांना सहकार्य केले नव्हते. शिवसेनेच्या प्रवक्त्या आमदार नीलम गोऱ्हे, राष्ट्रवादीच्या आमदार विद्या चव्हाण यांच्यासह नवी मुंबईच्या भाजपा आमदार मंदा म्हात्रे यांना मोबाइलवर आलेल्या मेसेज प्रकरणात गुप्ताचा सहभाग समोर आला. त्याच्याच मोबाइलमधून हे मेसेज पाठविल्याचे स्पष्ट झाले आहे.
आरोपी म्हणे ‘तो मी नव्हेच’!
By admin | Published: March 07, 2017 4:59 AM