शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
2
बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
3
मुंबईत घरभाड्याचे दर देशात सर्वाधिक; दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर, ठाण्यात किती भाडेवाढ?
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : अजित पवारांसह अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क; अनेक ठिकाणी ‘ईव्हीएम’मध्ये बिघाड!
5
A.R.Rahman divorce: "आम्हाला वाटलं होतं ३० वर्ष पूर्ण करू, पण...", ए. आर. रहमानचा २९ वर्षांचा संसार मोडला
6
केवळ शॉपिंग नाही, आता कमाई पण करून देणार 'ही' कंपनी; येणार ₹८००० कोटींचा बहुप्रतीक्षीत IPO
7
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
8
पराभव दिसू लागल्यानेच मविआकडून तावडेंवर हल्ला; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
9
जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार पादेश्वर महाराजांच्या गाडीवर दगडफेक; महाराज जखमी
10
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
11
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
12
Vaibhav Suryavanshi: १३ वर्षांच्या मुलाला उघडेल आयपीएलचं दार?
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
14
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
15
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
16
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
17
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
18
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
19
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
20
वाशिम येथे मतदानास सुरुवात; मतदारांना मिळतेय सहकार्य

आरोपीने घेतली मिठी नदीत उडी

By admin | Published: July 22, 2016 3:54 AM

एका घरफोडीच्या गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपीने न्यायालयाच्या आवारातून पळ काढत मिठी नदीमध्ये उडी घेतल्याची घटना बुधवारी कुर्ला येथे घडली.

मुंबई : एका घरफोडीच्या गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपीने न्यायालयाच्या आवारातून पळ काढत मिठी नदीमध्ये उडी घेतल्याची घटना बुधवारी कुर्ला येथे घडली. नदीला पाणी असल्याने आरोपीला बाहेर काढण्यासाठी पोलिसांनादेखील मोठी कसरत करावी लागली. अखेर आरोपीच बाहेर आल्याने पोलिसांनीदेखील सुटकेचा नि:श्वास सोडला.मोहम्मद साजिद अली शेख (२४) असे या आरोपीचे नाव असून, तो कुर्ला पश्चिम येथे राहतो. दोन दिवसांपूर्वी चेंबूर पोलिसांनी या आरोपीला एका घरफोडीच्या गुन्ह्यात अटक केली होती. बुधवारी पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले. त्यानंतर एका शिपायासोबत तो त्या ठिकाणी उभा असताना शिपायाचे लक्ष नसल्याचे पाहून आरोपीने न्यायालयाच्या परिसरातून पोबारा केला. हे पोलीस शिपायाच्या लक्षात येताच त्याने तत्काळ आरोपीचा पाठलाग केला. मात्र तोपर्यंत आरोपीने मिठी नदीत उडी घेतली होती. मिठी नदीला पाणी असल्याने आरोपीला तिथून बाहेरदेखील निघता येत नव्हते. मात्र पोलीस पुन्हा पकडतील, या भीतीने तो पाण्यात थांबला होता. अखेर कुर्ला पोलिसांना घटनेची माहिती दिल्यानंतर पोलीस लांबलचक दोरी घेऊन घटनास्थळी दाखल झाले. तब्बल १ तास या आरोपीला बाहेर काढण्याचे प्रयत्न पोलिसांकडून सुरू होते. पोलिसांनी त्याला बाहेर काढण्यासाठी दोरी फेकली. मात्र आरोपी बाहेर येण्यास तयार नव्हता. मात्र नंतर स्वत:ला वाचवण्यासाठी त्याने दोरीचा आधार घेतला. हे नाटक पाहण्यासाठी गर्दी जमा झाली होती. त्यानंतर कुर्ला पोलिसांनी या आरोपीवर गुन्हा दाखल करीत त्याला अटक केली. (प्रतिनिधी)