- लोकमत न्यूज नेटवर्क
सासवड (जि. पुणे) : आचार्य अत्रे हे पत्रकारितेतील उतुंग व्यक्तिमत्व होते. आजही पत्रकारिता सुरु करताना पत्रकार त्यांचा आदर्श पुढे ठेवला जातो. त्यांचाच घेतलेला वसा आम्ही खाली ठेवणार नाही, असे प्रतिपादन ‘लोकमत’च्या गोवा आवृत्तीचे संपादक राजू नायक यांनी केले.आचार्य अत्रे यांच्या ४८ व्या स्मृतिदिनानिमित्त सासवड येथे अत्रे प्रतिष्ठान व साहित्य परिषद सासवड शाखा यांच्या वतीने नायक यांना आचार्य अत्रे पत्रकार पुरस्काराने गौरवण्यात आले. या वेळी सत्काराला उत्तर देताना नायक बोलत होते. या कार्यक्रमात कवी अनिल कांबळे याना आचार्य अत्रे साहित्यिक पुरस्कार व बंडा जोशी यांना आचार्य अत्रे कलाकार पुरस्काराने गौरविण्यात आले. अत्रे प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष जयसाहेब पुरंदरे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. नायक म्हणाले, अत्रे यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत समाजाला जागे केले. पण ते सहिष्णू होते. अत्रे यांच्या शिष्यानीच गोव्यात येऊन वर्तमानपत्रे सुरु केली. मोठ्या शक्तींविरुद्ध लढताना अत्र्यांची प्रेरणा उपयोगी ठरते.