शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
4
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 
5
२५०० रुपयांच्या SIP नं बनले १ कोटी रुपये; SBI च्या 'या' म्युच्युअल फंडानं दिले छप्परफाड रिटर्न
6
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
7
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
8
मृणाल दुसानिसने पतीसोबत ठाण्यात सुरु केलं स्वतःचं रेस्टॉरंट, मराठी कलाकारांनी लावली उपस्थिती
9
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
10
Success Story : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
11
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
12
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
13
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
14
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
16
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
17
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
18
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
19
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
20
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?

दृष्टिहीन प्रांजलचे यूपीएससीमध्ये यश

By admin | Published: May 11, 2016 3:55 AM

उल्हासनगरच्या प्रांजल पाटील हिने आपल्या दृष्टिहीनतेवर मात करीत, यूपीएससी परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. गुणवत्ता यादीत ती ७७३ क्रमांकावर आहे

उल्हासनगर : उल्हासनगरच्या प्रांजल पाटील हिने आपल्या दृष्टिहीनतेवर मात करीत, यूपीएससी परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. गुणवत्ता यादीत ती ७७३ क्रमांकावर आहे. सनदी अधिकारी होऊन महाराष्ट्रात सेवा करण्याचा मनोदय प्रांजल हिने व्यक्त केला आहे. देशभरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. दिल्लीच्या जेएनयू विद्यापीठात पी.एचडी करीत तिने यूपीएससीत बाजी मारली आहे. उल्हासनगरच्या कॅम्प चारमधील यशवंत विद्यालयाशेजारील चाळीत राहणारी प्रांजल लहेनसिंग पाटील लहानपासूनच हुशार आहे. तिची नजर कमजोर होत गेल्यावर, सातव्या वर्षी अंधत्व आलेल्या प्रांजलने प्रत्येक परीक्षेत बाजी मारत यूपीएससी परीक्षा पहिल्याच प्रयत्नात, कोणतीही शिकवणी वर्ग न लावता उत्तीर्ण होत सर्वांचाच विश्वास सार्थ ठरवला. तिचे तिसरीपर्यंतचे शिक्षण उल्हासनगरातील आरजेएस शाळेत आणि पुढे दहावीपर्यंतचे दादरच्या कमला मेहता अंधशाळेत झाले. चांदीबाई महाविद्यालयात अकरावी-बारावी आणि मुंबईतील सेंट झेव्हिअर्स कॉलेजमध्ये शिक्षण पूर्ण केले. तेव्हा ती मुंबई विद्यापीठातून पहिली आली होती. तिने वडिलांकडे आयएएस होण्याची इच्छा व्यक्त केली. वडिलांनी परिस्थितीवर मात करीत, दिल्लीच्या जवाहरलाल विद्यापीठात प्रवेश मिळवण्यासाठी प्रांजलला मदत केली. तेथे एमए, एमफिल करून ‘जागतिक आंतरराष्ट्रीय राजकीय संबध’ या विषयात पी.एचडी चा अभ्यास सुरू केला. त्याचबरोबर, यूपीएससी परीक्षा देत यश मिळविले. ती सध्या जेएनयू विद्यापीठातच आहे. या यशात आई-वडील, पती, मित्रमंडळी, नातेवाईक, शिक्षक यांचा मोठा वाटा असल्याचे तिने नम्रपणे सांगितले. विद्यापीठाने दिलेल्या सुविधांबद्दलही तिने आभार मानले आहेत. प्रांजलच्या अभिनंदनासाठी तिच्या घरी आप्तेष्टांची गर्दी झाली. (प्रतिनिधी)