शहरं
Join us  
Trending Stories
1
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
2
INDW vs PAKW : पाक विरुद्ध विजयी जल्लोष! हरमनप्रीत कौर ब्रिगेडनं पुन्हा मारलं मैदान
3
हरियाणात कसं स्थापन होणार भाजप सरकार? नायब सैनी यांनी सांगितला पुढचा प्लॅन, म्हणाले...
4
पाकिस्तानात काहीही होऊ शकतं... आता थेट मुख्यमंत्रीच झाले बेपत्ता, नक्की प्रकरण काय?
5
Bigg Boss Marathi 5 : सूरज चव्हाण ठरला 'बिग बॉस मराठी ५'चा विजेता? 'त्या' पोस्टने खळबळ
6
Bigg Boss Marathi Season 5: रितेश देशमुखला मिळाल्या भाईजानकडून शुभेच्छा, म्हणाला, "सगळ्यांना वेड लावलं..."
7
कुणासोबत डिनर करायला आवडेल किम जोंग की जॉर्ज सोरोस? जयशंकर यांचं उत्तर ऐकूण टाळ्यांचा कडकडाट; बघा Video
8
IND vs PAK मॅचमध्ये Arundhati Reddy चा तोरा; ज्यानं प्रसादच्या अविस्मरणीय सीनला उजाळा (VIDEO)
9
ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची ९८ व्या अ.भा.म. साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड
10
Bigg Boss Marathi Season 5: दोन आठवडे 'भाऊचा धक्का' का झाला नाही? रितेशने प्रेक्षकांची माफी मागत सांगितलं कारण
11
अजित पवारांची आघाडी; जनसन्मान यात्रेत विधानसभेसाठी आणखी एका उमेदवाराच्या नावाची घोषणा
12
Bigg Boss Marathi 5 : अंकिता वालावलकर टॉप ३ मध्ये नाही? फिनालेआधीच मोठी अपडेट समोर, चाहते भडकले
13
INDW vs PAKW : रिचा घोषनं घेतला सुपर कॅच; पाक कॅप्टनचा खेळ खल्लास! (VIDEO)
14
"उत्तर गाझा खाली करा", IDF ची वॉर्निंग! इस्रायलकडून लेबनॉनमध्ये मृत्यूचं तांडव, हिजबुल्लाहचा पलटवार
15
Bigg Boss18 च्या प्रीमियरला आले अनिरुद्धाचार्य महाराज, सलमानला भेट दिली भगवद् गीता
16
अमेरिकेतील यशानंतर 'अमूल' आता युरोपमध्ये ठेवणार पाऊल!
17
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यावर 'क्रिकेटचा देव' सचिन तेंडुलकर म्हणतो- "हा सन्मान..."
18
"सरदार पटेलांचा पुतळा पूर्ण झाला पण..."; संभाजीराजे छत्रपतींनी स्पष्टच सांगितलं
19
'इस्रायलने इराणवर हल्ले करावे, पण...', जो बायडेन यांचा बेंजामन नेतन्याहूंना सल्ला
20
धोनी, विराट की रोहित... भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार कोण? 'युनिव्हर्स बॉस' ख्रिस गेलने दिलं उत्तर

‘अ‍ॅप’गुरूंचे असेही एकलव्य, अंगठ्याच्या जोरावर ज्ञान ग्रहण

By admin | Published: July 19, 2016 4:00 AM

एकलव्याची गोष्ट सर्वश्रुत आहे. एकलव्याने गुरुदक्षिणा म्हणून उजव्या हाताचा अंगठा दिला होता.

पूजा दामले,

मुंबई- एकलव्याची गोष्ट सर्वश्रुत आहे. एकलव्याने गुरुदक्षिणा म्हणून उजव्या हाताचा अंगठा दिला होता. पण सध्याच्या आधुनिक काळातले एकलव्य हे अंगठा न देता ‘त्या’च अंगठ्याच्या जोरावर म्हणजे ‘एका टच’मध्ये किंवा एका क्लिकवर ज्ञानाचे ग्रहण करून घेण्यात व्यग्र आहेत. इंटरनेट आणि तंत्रज्ञानाच्या जमान्यात सर्वच जण एकलव्याप्रमाणे ज्ञानग्रहणाचा मार्ग स्वीकारत आहेत.प्रोफेशनल लाइफपासून स्वयंपाकघर व्हाया संस्कार असे सर्व प्रकारचे ज्ञान हे सध्या एकलव्याच्या भूमिकेतून ग्रहण केले जात आहे. स्मार्ट फोनचा वापर वाढल्यापासून कोणत्याही गोष्टीचा शोध घेण्यासाठी अथवा शिकण्यासाठी इंटरनेटचा वापर केला जातो. पहिली पायरी म्हणजे ‘गुगल’वर ‘सर्च’ करणे, त्यानंतर ‘युट्यूब’वर व्हिडीओ पाहणे आणि रोजच्या रोज लागणार असेल तर थेट ‘अ‍ॅप्लिकेशन’ डाऊनलोड करणे. या तीन टप्प्यांमध्ये दडलेला ज्ञानाचा खजिना लुटण्यासाठी सर्वच जण उत्सुक असतात. एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये सायंकाळी आजी-आजोबा हे घरातील लहान मुलांना स्तोत्र शिकवायचे. पण, आता लहान मुलांना पुस्तकातून शिकवण्याऐवजी ‘अ‍ॅप’द्वारे शिकवले जाते. त्यात मनाचे श्लोक, हरिपाठ, भगवद्गीता, कविता, गोष्टी यांचादेखील समावेश आहे. नोकरदार महिलांना, मुलांना शिकवायला वेळ मिळत नाही. मग, या वेळी आईनंतर ‘अ‍ॅप’ हाच या मुलांचा गुरू होतो. ‘फिटनेस’साठी ‘अ‍ॅप’गुरू अथवा ‘युट्यूब’ला गुरू मानणारे अनेक जण आपल्याला भेटतात. इंग्रजी कसे बोलावे, शब्दांचे उच्चारण कसे करावेपासून कुठे जातोय यानुसार कोणते कपडे घालावेत यासाठीही व्हिडीओचा वापर केला जातो. युट्यूबवर जाऊन समस्या टाइप केल्यावरही त्याची उत्तरे मिळतात. बिघडलेल्या वस्तू कशा दुरुस्त कराव्यात ते अगदी नवीन वस्तूंच्या खरेदी करताना काय पाहावे, याचेदेखील व्हिडीओ सहज उपलब्ध आहेत. इतकेच कशाला ‘उदरभरणा’साठीचा गुरूही आता एका बटणावर उपलब्ध आहे. पन्नाशी पार करून साठीजवळ जाणाऱ्या महिलाही नवीन डिशेस शिकण्यासाठी टीव्हीवरील ‘कुकरी शोज’चा आधार घेताना दिसतात. तर, तरुण आणि मध्यमवयीन महिला या फेसबुक, युट्यूबवरील पदार्थांच्या व्हिडीओतूनही उत्तम ‘रेसिपी’ करून घरच्यांना खूश करतात. >सध्याच्या आधुनिक काळातल्या शिष्यांनी इंटरनेट आणि तंत्रज्ञानालाच आपला गुरू मानले आहे. त्यामुळे या पिढीतले एकलव्य हे ‘अंगठा’ न देता ‘त्या’च अंगठ्याच्या जोरावर म्हणजे ‘एका टच’मध्ये किंवा एका क्लिकवर ज्ञानाचे ग्रहण करून घेण्यात व्यग्र आहेत. इंटरनेट आणि तंत्रज्ञानाच्या जमान्यात सर्वच जण एकलव्याप्रमाणे ज्ञानग्रहणाचा मार्ग स्वीकारत आहेत.स्वत:चे आरोग्य सांभाळण्यसाठी तसेच वय, जीवनपद्धत, सवयी अशी माहिती देणारी ‘अ‍ॅप’ही उपलब्ध झाली आहेत. आजार टाळण्यासाठी काय करावे, काय खावे, किती चालावे हे सांगणारे ‘अ‍ॅप’च सर्वांचे व्हर्च्युअल झाले आहेत. काही अवधीतच त्यांना असतील तिथे ज्ञानार्जन करून देणारे हे ‘अ‍ॅप’गुरू आता जगतमान्य होत आहेत.