शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला मुख्यमंत्री व्हायचं आहे, पण…’’ अजित पवार यांनी सांगितली नेमकी अडचण  
2
“२ महिने राहिले, राज्यात सरकार बदलल्याशिवाय आता स्वस्थ बसणार नाही”; शरद पवारांचा निर्धार
3
'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
4
"घोडा नवऱ्याला घेऊन पळून गेला..."; सूरजने सांगितला वरातीमधला गंमतीदार किस्सा
5
नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका
6
‘लाडकी बहीण’ योजनेत पुन्हा गैरप्रकार समोर; ६ लाडक्या भावांचे अर्ज, ‘असा’ लागला शोध
7
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
8
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?
9
Akshay Shinde Encounter News अक्षय शिंदे एन्काउंटरप्रकरणी कोर्टाने पोलिसांना विचारले हे १० प्रश्न; न्यायाधीशांना ५०० राउंड फायर केल्याचा अनुभव
10
मनू भाकरचे नेटकऱ्यांना जोरदार प्रत्युत्तर; त्या घटनेवरुन ट्रोल करणाऱ्यांना सांगितला देशहिताचा विचार
11
इटलीच्या PM मेलोनी यांना डेट करताहेत इलॉन मस्क? चर्चांना उधाण, स्पष्टीकरण देत म्हणाले...  
12
क्रूरतेचा कळस! सहावीतील मुलाला शिक्षकाने काठी फेकून मारली, विद्यार्थ्याची दृष्टी गेली
13
“ब्रिजभूषण सिंहचा एन्काउंटर का केला नाही, RSSच्या लोकांना वाचवायला अक्षय शिंदेला संपवले”
14
'शरद पवार दैवत'ने अजित पवारांचं वाढवलं टेन्शन, सुप्रीम कोर्टात पोहोचलं प्रकरण
15
तिरुपती बालाजी मंदिर लाडू वादावर असदुद्दीन ओवेसी यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
16
तिरुपती लाडू प्रसादाच्या वादात मोठी कारवाई! टीटीडीकडून 'या' डेअरीच्या विरोधात तक्रार दाखल
17
सत्ता आल्यावर कसा निवडला जाणार मविआचा मुख्यमंत्री? पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितला फॉर्म्युला 
18
Zerodha मध्ये 2.75 कोटींचा घोटाळा! 'डीमॅट अकाऊंट'मुळे कसा बसला कोट्यवधींचा फटका?
19
Video - "मी ऑनलाइन गेममध्ये १५ लाख गमावले, मला ५००-५०० रुपयांची मदत करा"
20
Swiggyचा आयपीओ येण्यापूर्वी राहुल द्रविड पासून करन जोहर पर्यंत दिग्गजांच्या उड्या, पाहा डिटेल्स

रवी पुजारीसह १४ जणांवर कारवाई

By admin | Published: December 23, 2016 4:57 AM

खंडणीसाठी आपल्या हस्तकांमार्फत बिल्डर, व्यावसायिकांसह बड्या राजकीय नेत्यांना धमकावणाऱ्या गँगस्टर रवी आणि सुरेश पुजारी

ठाणे : खंडणीसाठी आपल्या हस्तकांमार्फत बिल्डर, व्यावसायिकांसह बड्या राजकीय नेत्यांना धमकावणाऱ्या गँगस्टर रवी आणि सुरेश पुजारी यांच्यासह १४ जणांविरुद्ध ठाणे पोलिसांनी मोक्कांतर्गत कारवाई केली आहे. यातील यश ऊर्फ रमेश पाटील याच्यासह ११ जणांना अटक केली आहे. या टोळीकडून आठ पिस्तूल, ३० काडतुसे, चार मॅगझिन आणि दोन मोटारसायकली असा सुमारे अडीच लाखांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.या टोळीतील रवी, सुरेश पुजारी आणि बिहारचा महेंद्र असे तिघे जण पसार आहेत. या सर्वांवर खंडणी, खुनाचा प्रयत्न, खून आणि हाणामारी असे तब्बल १४० गुन्हे वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये दाखल आहेत. या टोळीने प्रत्येक वेळी बड्या असामींकडे एक ते दोन कोटींच्या खंडणीची मागणी केली आहे. परदेशातून रवी आणि सुरेश पुजारी हे दोघे टोळीची सूत्रे चालवत असून खंडणीसाठी त्यांनी मुंबई, ठाणे परिसरात गोळीबाराचे अनेक प्रकार केल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यांच्या वाढत्या कारवायांवर अंकुश आणण्यासाठी गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निवृत्ती कदम यांनी त्यांच्याविरुद्ध संघटित गुन्हेगारी कारवाया, अर्थात मोक्कांतर्गत कारवाईचा प्रस्ताव तयार केला. पोलीस आयुक्त पराग मणेरे आणि अतिरिक्त पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर त्यांच्यावर ही कारवाई केल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त मुकुंद हातोटे यांनी दिली.यश ऊर्फ पप्या ऊर्फ प्रकाश ऊर्फ रमेश पाटील, विजयप्रकाश पुजारी, दयानंद अमिन ऊर्फ पुजारी, मिथुन ऊर्फ मिठ्ठू नीलमणी करमोकर, विष्णू ऊर्फ सोनी चंदुमल तेजवानी, नरेश गुजरण ऊर्फ भंडारी, हनुमंत गायकवाड, राहुल लोंढे, रवींद्र घारे, रोहन डिकोस्टा आणि इकलाख शेख अशी याप्रकरणी अटक केलेल्या ११ जणांची नावे आहेत. हे सर्व जण उल्हासनगर, नवी मुंबई आणि सोलापूर परिसरातील रहिवासी आहेत. यातील सुरेशवर २२ तर रवीवर ३५ गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. उल्हासनगरचे बिल्डर सुमित चक्रवर्ती यांच्या कार्यालयावर ११ जुलै २०१६ रोजी याच टोळीतील दोघा शूटर्सने गोळीबार केला होता. अलीकडेच मुंबईच्या विलेपार्ले येथील हॉटेलवरही खंडणीसाठी याच टोळीतील शूटर्सने गोळीबार केला. खंडणी उकळताना गोळीबार केल्यानंतर रवी पुजारीचा परदेशातील १२ अंकी मोबाइल क्रमांक देऊन ही टोळी पसार होत होती. (प्रतिनिधी)