पुणे : कोरोनाच्या काळात शुल्कवाढीचा निर्णय घेऊन विद्यार्थ्यांकडून वाढीव शुल्क वसूल करणाºया महाविद्यालयांवर कारवाई केली जाईल. तसेच महाविद्यालय बंद असल्यामुळे जिमखाना, डेव्हलपमेंट शुल्क आकारता येणार नाही. केवळ शैक्षणिक शुल्क आकारता येईल, असे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी स्पष्ट केले.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षेचा आढावा घेतल्यानंतर पत्रकार परिषदेत सामंत बोलत होते. ते म्हणाले, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पंधरा टक्के शुल्क वाढीचा निर्णय मागे घेतला आहे. विद्यापीठाशी संलग्न स्वायत्त महाविद्यालयांनासुद्धा शुल्कवाढ करता येणार नाही. अशा महाविद्यालयांवर कडक कारवाई केली जाईल. कोरोना काळात सर्व महाविद्यालय बंद आहेत. त्यामुळे शैक्षणिक शुल्क आकारता येणार नाही.
वाढीव शुल्क वसूल करणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाई - उदय सामंत
By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2020 2:45 AM