शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
5
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
6
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
7
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
8
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
9
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
10
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
11
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

हॉर्नचा ‘आवाज दाबा’; वाहननिर्मात्यांना आवाहन, भाेंग्यांवरून मुंबई पोलिसांचा पुढाकार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2022 6:02 AM

पोलिसांनी ऑटोमोबाईल उत्पादकांना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार वाहनांच्या हॉर्नची आवाज मर्यादा कमी करण्याची विनंती केली आहे.

मुंबई : धार्मिक स्थळांवरील  ध्वनिक्षेपकाच्या वापरावरून वाद सुरू असताना, मुंबई पोलिसांनी ध्वनी प्रदूषणावर  नियंत्रण आणण्यासाठी विशेष अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. तसेच, ऑटोमोबाईल उत्पादकांना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार वाहनांच्या हॉर्नची आवाज मर्यादा कमी करण्याची विनंती केली आहे.

अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, वाहनांच्या हॉर्नचा आवाज ९२ ते ११२ डेसिबलच्या श्रेणीत आहे, जो सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करत आहे. यासंदर्भात विविध ऑटोमोबाईल उत्पादकांसोबत बैठक घेत त्यांना,  ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी वाहनांच्या हॉर्नचा आवाज कमी करण्यास सांगितल्याचे त्यांनी नमूद केले आहे. मुंबई पोलिसांनी यापूर्वी विनाकारण हॉर्न वाजविणाऱ्यांवर धडक कारवाई सुरू केली आहे.

यासोबतच सण, उत्सवाच्या काळात जोरजोरात ढोल वाजवणे व डॉल्बी साऊंड सिस्टीमवरून मोठ्या आवाजात गाणी, फटाके वाजवणे यामुळे मोठ्या प्रमाणात ध्वनिप्रदूषण होत असते. ध्वनिप्रदूषणामुळे सार्वजनिक शांततेचा भंग होत असतो. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी मुंबई पोलिसांकडून  प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये ध्वनिप्रदूषणासंदर्भात एका विशेष पोलीस निरीक्षकाची नेमणूक केलेली आहे. 

संबंधित अधिकाऱ्याकडे थेट ध्वनिप्रदूषणाबाबत तक्रार करता येणार आहे. यामध्ये तक्रारदाराची ओळख उघड होणार नाही, याबाबत पोलिसांकडून खबरदारी घेण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनीही सहकार्य करण्याचे आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे. ...तर ७ वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूदnसर्वोच्च न्यायालयाने पर्यावरण संरक्षणाचा कायदा सन १९८६  व ध्वनिप्रदूषण अधिनियम २००० मधील तरतुदींचे सक्त पालन करण्याबाबत मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसार रात्री १०  वाजल्यापासून सकाळी ६ वाजेपर्यंत लाऊड स्पीकर, फटाके, वाद्ये वाजविण्यास सक्त बंदी केलेली आहे. 

  • सकाळी ६ वाजल्यापासून रात्री १०  वाजल्यापर्यंतसुद्धा लाऊड स्पीकर, फटाके, वाद्ये आदींवर मर्यादा ठेवण्यात आल्या आहेत. या नियमांचे उल्लंघन केल्यास ध्वनिप्रदूषणासाठी ५  वर्षे कैदेची किंवा एक लाख रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. 
  • शिक्षा होऊनही गुन्हे सुरू राहिल्यास पुढील प्रत्येक दिवसाला पाच हजार रुपये दंडाची तरतूद आहे.
  • कलम  १५  (१) प्रमाणे शिक्षा होऊन एका वर्षात पुन्हा असे गुन्हे केल्यास ७ वर्षांपर्यंतची शिक्षा होऊ शकते. याबाबतही पोलिसांकडून जनजागृती करण्यात येत आहे.

कुठे किती, आवाजाची मर्यादा? (डेसिबलमध्ये)

         विभाग     दिवसा      रात्री औद्योगिक क्षेत्र      ७५          ७० विपणन क्षेत्र         ६५          ५५ रहिवासी क्षेत्र        ५५          ४५ शांतता विभाग       ५०          ४०  

टॅग्स :MumbaiमुंबईSupreme Courtसर्वोच्च न्यायालय