मुंबई : सीआरझेच्या धोरणाचे उल्लंघन केल्याबाबत हास्यअभिनेते कपिल शर्मा यांच्याविरूद्ध केलेल्या कारवाईचा बडगा त्याच भागातील अन्य प्रतिथयश व्यक्तींविरूद्धही उगारावा, अशी मागणी कपिल शर्मा यांजे चाहते अब्दुल चौधरी यांनी संबंधितांकडे केली आहे. मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी दीपेंद्र सिंह कुशवाह यांनीही याप्रकरणी १५ दिवसांच्या आत कारवाई सुरू करावी, असे निर्देश दिल्याचे स्पष्ट केले आहे.कपिल शर्मा यांनी महापालिका अधिकाऱ्यांकडून लाच मागितल्याबद्दची तक्रार ट्विटरवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केल्यानंतर मुंबई महापालिका, म्हाडा तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाने शर्मा यांच्या अंधेरी पश्चिमच्या आरामनगर परिसरातील बांधकामाची सखोल चौकशी केली. त्यानंतर सीआरझेडच्या कायद्याचे उत्लंघन केल्याबाबत शर्मा यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला. या परिसरात जावेद जाफरी, शक्ती कपूर, आयेशा झुल्का, सोनू सूद, कैलाश खेर अशा जवळजवळ टझनभर कलाकारांनी आपली घरे, कार्यालये वा स्टुडिओ थाटली आहेत. आरामनगर परिसरातील तब्बल १३५ बंगले व्यावसायिकवापरासाठी रूपांतरीत केले गेले आहेत. त्यातील ५२ घरे स्टुडिओत परावतर्तित करण्यात आली आहेत. आठ ठिकाणी व्यायामशाळा चालवल्या जातात. सह ठिकाणी डान्स हॉल आहेत. चार सलून तर १७ दुकाने आहेत. पाच ठिकाणी शाळा वा कोचिंग क्लासेस चालवले जात आहेत, असे तक्रारदार चौधरी यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. याबाबतचे पुरावे त्यांनी महापालिका, म्हाडा, जिल्हाधिकारी तसेच इतर तत्सम खात्यांकडे सोपवले आहेत.याबाबत जिल्हाधिकारी कुशवाह यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी आपल्या्रडे अशी तक्रार आल्याचे सांगितले. पण या तक्रारीच्या आधीच आपण महापालिका आणि म्हाडाला याबाबतची माहिती देण्याची सूचना दिली आहे. येत्या पंधरा दिवसात सीआरझेड कायद्याचे उल्लंघन कारवाई करावी, असे निर्देश दिल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
कलाकारांच्या अतिक्रमणावर कारवाईचा बडगा
By admin | Published: March 07, 2017 2:01 AM