शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
5
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
6
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
7
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
8
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
9
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
10
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
11
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
12
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
13
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
14
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
15
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
16
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
17
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
18
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
20
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...

माजी मंत्री गावितांसह दोषींवर कारवाई

By admin | Published: June 25, 2017 3:48 AM

न्या. गायकवाड समितीच्या अहवालानुसार भ्रष्टाचाराचा ठपका ठेवलेले माजी आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्यासह आदिवासी विकास विभागातील संबंधित

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : न्या. गायकवाड समितीच्या अहवालानुसार भ्रष्टाचाराचा ठपका ठेवलेले माजी आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्यासह आदिवासी विकास विभागातील संबंधित अधिकाऱ्यांवर लवकरच कारवाई करण्यात येणार आहे. आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांनी त्याबाबतचे संकेत शुक्रवारी नाशिक दौऱ्यात दिले.आदिवासी विकास विभागात परिसर सेवा संस्थांकडून वसतिगृह व आश्रमशाळा सुधारणा व अंमलबजावणीसाठी बोलविण्यात आलेल्या आढावा बैठकीसाठी ते नाशिकला आले होते. या सेवा संस्थांनी सुचविलेल्या सूचना निश्चितच आदिवासी विकास विभागासाठी मार्गदर्शक असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे आदिवासी विकास विभाग नेहमीच खरेदी आणि निविदांच्या प्रकारामुळे चर्चेत येतो. त्याला फाटा देण्यासाठी यावर्षापासून विभागामार्फत आदिवासी विद्यार्थ्यांसाठी पुरवठा करण्यात येणाऱ्या १७ वस्तूंचा थेट लाभ आदिवासी विद्यार्थ्यांच्या बॅँक खात्यात जमा करण्याचा निर्णय विभागाने घेतला असून, त्याची अंमलबजावणी करीत या विद्यार्थ्यांच्या खात्यावर ६० टक्के रक्कमही वितरित करण्यात आल्याचे सावरा यांनी सांगितले. तसेच वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना घरभाडे व दोन वेळचा नाश्ता व जेवणाचे बिल देण्याची योजना सुरू करण्यात आली आहे. न्या. गायकवाड समितीने भ्रष्टाचाराचा ठपका ठेवल्यावर काय कारवाई करणार? या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सांगितले की, न्या. गायकवाड समितीने सीलबंद अहवाल सादर केला आहे. तो उघडण्यात आल्यानंतर त्यातील दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल. त्यामुळे माजीमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्यापुढील अडचणी वाढणार असून, यातील दोषी आढळलेल्या आदिवासी विकास विभागाच्या अधिकाऱ्यांचीही डोकेदुखी वाढणार आहे.