लोकमत न्यूज नेटवर्कअंबरनाथ : आपल्यावरील कारवाई टाळण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करणाऱ्या व्यापाऱ्यांना हे प्रकरण अंगाशी येणार कळल्यावर त्यांनी न्यायालयातून माघार घेतली. तर दुसरीकडे दुकानांवर बुलडोझर फिरू नये यासाठी व्यापाऱ्यांनी तहसीलदारांपासून ते कोकण विभागीय आयुक्तांचे उंबरठे झिजवायला सुरूवात केली आहे. अशा परिस्थितीत प्रशासन या बेकायदा दुकानांवर कारवाई करणार का असा प्रश्न अंबरनाथमधील नागरिकांनी उपस्थित केला आहे.बेकायदा इमारत, झोपड्यांवर कारवाई करणारे प्रशासन मस्तवाल व्यापाऱ्यांवर हातोडा चालवणार का? की त्यांना पाठिशी घालणार असा प्रश्नांचा भडिमार नागरिकांनी केला आहे. कल्याण-बदलापूर राज्य महामार्गाला लागून असलेल्या ४५ बेकायदा दुकानांवर कारवाईचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्यानुसार पोलीस बंदोबस्त दिला असून ही कारवाई सकाळी ११ वाजता सुरू होणार आहे. तर दुसरीकडे या दुकानदारांनी कोकण विभागीय आयुक्तांकडे दाद मागितली असून त्यावर दुपारी ३ वाजता सुनावणी होणार आहे. त्यामुळे उद्याची कारवाई देखील अधांतरीच राहणार असे बोलले जात आहे. >व्यापाऱ्यांची खेळीसामाजिक कार्यकर्ते शौकत शेख यांच्या तक्रारीवरून बुधवारी या दुकानांवर कारवाई करण्यात येणार आहे. त्यासाठी तहसीलदारांनी बंदोबस्तही मागवला आहे. कारवाई लांबवण्यासाठी व्यापाऱ्यांनी कोकण आयुक्तांकडे दाद मागितली.
कारवाई टाळण्यासाठी धडपड
By admin | Published: June 07, 2017 4:05 AM