मुंबई : सीबीआय आणि सीव्हीसी (केंद्रीय दक्षता आयोग) या संस्थांच्या तपासणीतून बँकांना सरसकट सूट देता येणार नाही. पण, काही प्रकरणात असे दिसून आले की, कर्ज देण्याचा निर्णय योग्य त्या पडताळणीनंतर घेण्यात आलेला आहे. तर अशा प्रकरणात आवश्यक ते संरक्षण देण्यात येईल, असे स्पष्टीकरण रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी केले आहे. सीबीआय व सीव्हीसीसारख्या तपास संस्थातून सूट देण्याची मागणी काही ठिकाणाहून आली होती. या पार्श्वभूमीवर राजन यांनी हे विधान केले आहे. येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, काही अधिकाऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे की, प्रामाणिक काम केल्याच्या प्रकरणातही त्यांना जबाबदार ठरवायला नको. (प्रतिनिधी)
बँकांवर कारवाई अटळ
By admin | Published: July 19, 2016 4:42 AM