नवी मुंबई : नेरूळ येथील सारसोळे गावातील एका चार मजली अनधिकृत इमारतीवर सिडकोने बुधवारी कारवाई केली. विशेष म्हणजे गेल्या महिन्यात याच इमारतीवर कारवाई करून काही भाग जमीनदोस्त करण्यात आला होता. बुधवारी कारवाई करून ही इमारत जमीनदोस्त करण्यात आली.उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार विनापरवाना उभारण्यात आलेल्या इमारतींवर सिडकोने कारवाई सुरू केली आहे. सारसोळे सेक्टर ६ येथे सुमारे १00 चौरस मीटरच्या भूखंडावर चार मजली अनधिकृत इमारत उभारण्यात आली होती. याप्रकरणी संबंधित बांधकामधारकाला सिडकोच्या वतीने रीतसर नोटीस बजवण्यात आली होती. त्यानंतर १९ मे रोजी या इमारतीवर धडक कारवाई करण्यात आली. यावेळी या इमारतीचा काही भाग पाडून टाकण्यात आला होता. आज उर्वरित भागही जमीनदोस्त करण्यात आला. सिडकोच्या अनधिकृत बांधकाम नियंत्रण पथकाचे नियंत्रक पी.बी. राजपूत, कार्यकारी अभियंता ए.बी. रसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या कारवाईसाठी नेरूळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अदिकराव पोळ हे स्वत: उपस्थित होते. तसेच याप्रसंगी ४४ पोलीस कर्मचाऱ्यांचा ताफा तैनात ठेवण्यात आला होता. (प्रतिनिधी)संबंधित बांधकामधारकाला सिडकोच्या वतीने रीतसर नोटीस बजवण्यात आली होती. १९ मे रोजी या इमारतीवर कारवाई करण्यात आली.
इमारतीवर कारवाई
By admin | Published: June 10, 2016 2:50 AM