शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
3
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
4
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
5
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
6
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
7
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
8
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
9
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
10
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
11
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
12
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
13
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
14
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
15
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
16
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
17
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
18
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
19
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

जबरदस्तीने वर्गणी गोळा केल्यास कारवाई

By admin | Published: August 24, 2016 12:55 AM

सर्वांनी नियमांचे, न्यायालयाच्या आदेशाचे पालन करावे. मंडळांच्या कार्यकर्त्यांकडून काही चुका झाल्यास आम्हाला न्यायालयात उत्तर द्यावे लागते.

पिंपरी : शहरातील सार्वजनिक मंडळांना एकाच ठिकाणी परवानगी देण्यात येईल. सर्वांनी नियमांचे, न्यायालयाच्या आदेशाचे पालन करावे. मंडळांच्या कार्यकर्त्यांकडून काही चुका झाल्यास आम्हाला न्यायालयात उत्तर द्यावे लागते. जबरदस्तीने वर्गणी गोळा करू नका, पोलीस यंत्रणेचे लक्ष आहे. उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी पोलिसांना सहकार्य करा, असे आवाहन पुणे शहर पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी केले. पिंपरी येथील आचार्य अत्रे सभागृहात महापालिका आणि पुणे शहर पोलीस आयुक्तालय यांच्या वतीने गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांची शांतता बैठक झाली. या वेळी खासदार श्रीरंग बारणे, महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे, सह आयुक्त सुनील रामानंद, अतिरिक्त आयुक्त शशिकांत शिंदे, उपायुक्त डॉ. बसवराज तेली, वाहतूक शाखेचे सहायक आयुक्त राजेंद्र भामरे, राम मांडुरके, वैशाली जाधव-माने शिंदे उपस्थित होते.पोलीस आयुक्त शुक्ला यांनी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना विविध सूचना केल्या. नियमांचे पालन, तसेच कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, याची दक्षता घ्यावी. पोलीस परवाना प्रक्रिया सुलभ केली आहे. एकाच ठिकाणी परवाने मिळतील.’’महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे म्हणाले, ‘‘प्रत्येक विसर्जन घाटावर निर्माल्यकलश ठेवण्यात येणार आहेत. मुंबईत ज्याप्रमाणे इकोफे्रंडली गणेशोत्सव साजरा केला जातो, त्याच धर्तीवर शहरातील गणेश मंडळांनी गणेशोत्सव साजरा करावा. खासदार बारणे म्हणाले, ‘‘कायदा, सुव्यवस्थेला बाधा पोहोचणार नाही. याची काळजी मंडळांनी घ्यावी. (प्रतिनिधी)>प्रत्येक पोलीस ठाण्यातर्फे व्हॉट्स अ‍ॅप ग्रुप तयार करण्यात येणार असून, मंडळांच्या अध्यक्षांना त्यात समाविष्ट करुन घेतले जाणार आहे. - रश्मी शुक्ला, पोलीस आयुक्त