ऑनलाइन लोकमतचंद्रपूर, दि. 29 - मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अनधिकृत ठरविण्यात आलेल्या १७ पैकी १२ धर्मस्थळांवर काल बुधवारी झालेल्या कारवाईनंतर आज गुरूवारी सकाळपासून पुन्हा कारवाई सुरू करण्यात आली. मात्र तुकूम परिसरातील सत्वाचा मारोती नावाने ओळखल्या जाणारे मंदिर हटविताना प्रशानाला नागरिकांच्या रोषाशी सामना करावा लागला. हे मंदिर हटवू नये यासाठी नागरिकांनी सकाळपासूनच भजनाचा कार्यक्रम ठेवला होता. मंदिर हटविण्यासाठी पथक पोहचताच नागरिक हजारोंच्या संख्येने गोळा झाले. नागरिकांनी प्रचंड विरोध केल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली होती. परिस्थिती ओळखून दंगा नियंत्रण पथकालाही पाचारण करण्यात आले होते. तरीही नागरिकांचा विरोध कायमच होता. अखेर सायंकाळी यावर तोडगा निघाला. मंदिराचा काही भाग आणि ग्रील हटविण्याचे भाविकांनी मान्य केले. त्यानंतर हा तिढा सुटला. दरम्यान गुरुवारी दिवसभरात पाच ठिकाणांवरील अनधिकृत धर्मस्थळे हटविण्यात आली. पोलिसांचा बंदोबस्त चोख होता.
अनधिकृत धर्मस्थळे हटविण्याची कारवाई दुसऱ्या दिवशीही सुरूच
By admin | Published: December 29, 2016 8:19 PM