कोल्हापूर : राज्यात बेकायदेशीररीत्या अनेक औषध कंपन्या कीटकनाशकांची राजरोस विक्री करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. दिल्ली येथील अॅग्रो कंपनी टोल फ्री नंबर देऊन कीटकनाशकांचे आॅनलाइन बुकिंग करीत आहे. त्यांच्यावर त्वरित गुन्हा दाखल करण्याचे आदेश विभागीय कृषी सहसंचालकांना दिल्याची माहिती कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.राज्यमंत्री खोत यांच्या अध्यक्षतेखाली निविष्ठा व गुणनियंत्रण आढावा बैठक शुक्रवारी ‘आत्मा’ कार्यालयात झाली. या वेळी कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यातील कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत खोत म्हणाले, यवतमाळ विषबाधेची घटना दुर्दैवी असून शेतकºयांनी कोणती औषधे वापरली, फवारणीसाठी कोणते पंप वापरले यांची माहिती घेऊन संबंधित कंपन्यांवर कारवाई केली आहे. कर्नाटकातून ‘डीआयओ-३०३’ हे कीटकनाशक विक्रीसाठी येत असून, या कंपनीवरही गुन्हे दाखल करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
कीटकनाशकांची आॅनलाइन विक्री करणा-यांवर कारवाई: सदाभाऊ खोत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 3:44 AM