मुंबई : वारंवार आवाहन करून संपातून माघार न घेतल्याने एसटी महामंडळाने निलंबित कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्याचे सत्र सुरूच ठेवले आहे. बुधवारी एसटी महामंडळाने ४० निलंबित कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले असून, आत बडतर्फ कर्मचाऱ्यांची संख्या ६०३ वर पोहोचली आहे. याशिवाय आतापर्यंत महामंडळाने १०,७६४ कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे.
महामंडळाने आतापर्यंत राेजंदारीवरील अडीच हजार कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त केली असून, १०,७६४ कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. २,७९६ कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. मात्र, निलंबनाच्या कारवाईनंतरही कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या खूपच कमी आहे. त्यामुळे आता निलंबित कामगारांना बडतर्फीची कारणे दाखवा नोटीस दिली जात आहे. गेल्या १५ दिवसांत १५३९ कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस महामंडळाकडून बजावली.