पुणे : केंद्र शासनाने ५०० व १००० हजार रुपयांची नोटीचा वापर बंद केल्याने एकच खळबळ उडाली असून, अनेक ठिकाणी जीवनावश्यक सेवा देखील देण्यास नकार देत आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनमानावरच परिणाम होण्याची शक्यता असून, जीवनावश्यक वस्तूसाठी ‘नोट’ नाकारल्यास कारावई करण्यात येतील असा इशारा जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी दिला आहे. केंद्र शासनाने ८ नोव्हेंबरच्या रात्री १२ वाजल्यानंतर पाचशे व हजार रुपयांची नोट चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केल्यानंतर शहरामध्ये सर्व पेट्रोल पंपावर प्रचंड रागा लागल्या होत्या. यामध्ये अनेक ठिकाणी सुट्टे पैसे न दिल्याने पेट्रोल देण्यास नकार देण्यात आला. तर बुधावरी सकाळी व्यवहार सुरु झाल्यानंतर दुध, भाजीपाला, गॅस सिलिंडरसाठी पैसे देण्यासाठी देखील नागरिकांकडे सुट्टे पैसे नसल्याने अनेक अडचणी निर्माण झाल्या.शहरातील काही नामाकिंत रुग्णालयांमध्ये हॉस्पीटल व्यवस्थापनाने रुग्णांकडून ५००, १००० च्या नोटा स्विकारण्यास नकार दिल्याच्या तक्रारी आल्या आहेत. या गोष्टी लक्षात घेऊन जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी सायंकाळी स्वतंत्र आदेश काढून जीवनावश्यक वस्तूसाठी ‘नोट’ घेण्यास नकार दिल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.
जीवनावश्यक सेवांसाठी ‘नोट’ नाकारल्यास कारवाई
By admin | Published: November 10, 2016 2:06 AM