शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
2
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
3
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
4
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
5
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
6
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
7
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
8
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
9
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
10
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
11
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
12
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
13
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
14
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
15
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
20
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...

अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांवर कारवाई

By admin | Published: November 03, 2016 2:45 AM

महानगरपालिका आयुक्त सुधाकर शिंदे यांनी पनवेल महानगरपालिका हद्दीत बिल्डर व अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांना दणका दिला.

पनवेल : महानगरपालिका आयुक्त सुधाकर शिंदे यांनी पनवेल महानगरपालिका हद्दीत बिल्डर व अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांना दणका दिला. रस्त्यावर बांधकाम साहित्य टाकून अडचण निर्माण करणाऱ्यांना बांधकाम परवानगीच्या अटींचा भंग केल्याबद्दल त्यांच्या बांधकामाला स्थगिती दिली व अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याच्या नोटिसा बजावल्या, त्यामुळे पनवेलकर समाधानी आहेत.पनवेल महानगरपालिका स्थापन झाल्यापासून आयुक्त सुधाकर शिंदे यांना पाहणी दौऱ्यात अनेक ठिकाणी काही जण बांधकाम साहित्य रस्त्यावर टाकत असल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी स.नं. ७९७ साई नगर, तुलसी बिल्डर्स, प्रॉपर्टी क्र . ८५४ याकुब बेग ट्रस्ट, प्रॉपर्टी क्र .८९९ , ९८० असिन कानाजी शाह, प्रॉपर्टी क्र . ८४९ , ८४९/१ , ८५०, ८५०/१ मे. वी.बी. रिओलिटीज, अ.भू. क्र . ४१६ /१ मे. खान एन्टरप्रायजेस यांच्या कामाला स्थगिती दिली आहे. मनपा हद्दीत समावेश झालेल्या भागात अनधिकृत बांधकाम करीत असलेल्या अब्दुल आजिज शेख - रोडपाली, जगदीश के. पाटील - रोडपाली, मच्छिंद्र गोविंद पाटील, रोहिंजण, दशरथ म्हात्रे आसूडगाव, महादेव सोमवार भगत कळंबोली यांना नोटीस देण्यात आली आहे. आयुक्तांनी यापुढे कोणी अनधिकृत बांधकाम करताना आढळल्यास त्याला कारवाईला तोंड द्यावे लागेल, असा इशाराही दिला आहे. (वार्ताहर)