शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपच्या पहिल्या यादीत बहुतेक जुन्याच चेहऱ्यांना संधी; फडणवीस यांच्यासह सर्व १० मंत्री मैदानात
2
तीन आमदारांचे टेन्शन वाढले; मुंबईत नार्वेकर, लोढा, शेलार यांचा अपेक्षेप्रमाणे पहिल्या यादीत समावेश
3
भाजपच्या ठाणे जिल्हा यादीत प्रस्थापितांवरच पसंतीची मोहोर! तर्कवितर्कांना पूर्णविराम, उमेदवारी जाहीर
4
विधानसभेसाठी भाजपाकडून महामुंबईत विद्यमान २३ आमदार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार!
5
महाविकास आघाडी तुटण्याच्या दिशेने?; भास्कर जाधव कडाडले, काँग्रेसला करून दिली आठवण
6
जम्मू काश्मीरात दहशतवादी हल्ला; गांदरबल इथं गोळीबारात ३ मजूर ठार तर ५ जखमी
7
समाजवादी गणराज्य पक्ष काँग्रेसमध्ये विलीन; कपिल पाटील यांचा दिल्लीत पक्षप्रवेश
8
नाशिकमध्ये सीमा हिरेंच्या उमेदवारीला पक्षातच विरोध; महायुतीत बंडखोरीची शक्यता
9
"आमच्यात वाद नव्हताच..."; उमेदवारी न मिळालेल्या भाजपा आमदार अश्विनी जगपात यांचं विधान
10
१५ बैठका, ३४० तास चर्चा तरीही जागावाटप सुटेना; 'मातोश्री'तील बैठकीत काय घडलं?
11
पक्षफुटीनंतरही एकनिष्ठ राहिलेल्या आमदाराचा शरद पवारच करणार 'करेक्ट कार्यक्रम'?
12
कुटुंबवादामुळे तरुणांचे नुकसान; 1 लाख तरुणांना राजकारणात आणणार, PM मोदींची घोषणा
13
Video - मोबाईलवर बोलत रेल्वे ट्रॅक ओलांडत होता 'तो'; अचानक समोरून आली ट्रेन अन्...
14
कडक सॅल्यूट! पतीचा मृत्यू झाला पण 'तिने' हार नाही मानली; ई-रिक्षा चालवून भरतेय कुटुंबाचं पोट
15
दारुण पराभवानंतर BCCI चा मोठा निर्णय; उर्वरीत मालिकेसाठी स्टार खेळाडूला मिळाली संधी
16
नात्याला काळीमा! नातवाने त्रिशूळाने वार करून केली आजीची हत्या, शिवलिंगावर रक्ताचा अभिषेक
17
मुंबईतल्या 'या' १४ जागांवर भाजपाचे उमेदवार ठरले; ३ विद्यमान आमदार प्रतिक्षेत 
18
ज्योती मेटे यांचा शरद पवार गटात प्रवेश, विधानसभा निवडणूक लढवण्याबाबत म्हणाल्या...
19
महिलेशी मैत्री, हॉटेलमध्ये भेटायला बोलावलं अन्...; कसा पकडला गेला शार्प शूटर सुक्खा?
20
जास्तीत जास्त मुले जन्माला घाला, अन्यथा..; CM चंद्रबाबू नायडूंचे आवाहन, कारण काय?

एलबीएसवरील अनधिकृत दुकानांवर कारवाई

By admin | Published: July 23, 2016 2:13 AM

महाराष्ट्र काटा ते सुर्वे चौकदरम्यानच्या लाल बहादूर शास्त्री मार्गावरील सुमारे ८० अनधिकृत बांधकामांवर महापालिकेकडून शुक्रवारी कारवाई करण्यात आली.

मुंबई : कुर्ला पश्चिमेकडील ‘एल’ विभागातील महाराष्ट्र काटा ते सुर्वे चौकदरम्यानच्या लाल बहादूर शास्त्री मार्गावरील सुमारे ८० अनधिकृत बांधकामांवर महापालिकेकडून शुक्रवारी कारवाई करण्यात आली.४ जुलै रोजी झालेल्या विभागप्रमुखांच्या बैठकीत तसेच १८ जुलैच्या परिमंडळीय उपायुक्तांच्या बैठकीत लाल बहादूर शास्त्री मार्गावरील अनधिकृत बांधकामे, स्टॉल्स हटविण्याच्या सूचना आयुक्त अजय मेहता यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली. परिमंडळ ५ चे उपायुक्त भारत मराठे यांच्या नेतृत्वाखाली ‘एल’ विभागातील ३५ जणांच्या चमूने ही कारवाई केली. ही कारवाई करण्यासाठी पोलिसांच्या २० जणांच्या चमूचे सहकार्य घेण्यात आले. ही कारवाई पुढील आठवड्यातही सुरू राहणार आहे, असे ‘एल’ विभागाचे साहाय्यक आयुक्त अजयकुमार आंबी यांनी सांगितले.‘एल’ विभागाद्वारे करण्यात आलेल्या कारवाईवेळी ३० अनधिकृत स्टॉल्स व ५० दुकाने हटविण्यात आली आहेत. या कारवाईसाठी महापालिकेच्या चमूमध्ये अधिकारी, कर्मचारी व कामगार यांच्यासह ३५ जणांचा समावेश होता. तर दोन जेसीबी, दोन डंपर, सहा टेम्पो इत्यादी वाहनांचाही वापर कारवाईसाठी करण्यात आला. या कारवाईमुळे लाल बहादूर शास्त्री मार्गावरील वाहतूक अधिक सुलभ होणार आहे. (प्रतिनिधी)>परिमंडळ ५ चे उपायुक्त भारत मराठे यांच्या नेतृत्वाखाली ‘एल’ विभागातील ३५ जणांच्या चमूने ही कारवाई केली. ही कारवाई करण्यासाठी पोलिसांच्या २० जणांच्या चमूचे सहकार्य घेण्यात आले. ही कारवाई पुढील आठवड्यातही सुरू राहणार आहे, असे ‘एल’ विभागाचे साहाय्यक आयुक्त अजयकुमार आंबी यांनी सांगितले.