शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

‘ध्वनीप्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई’

By admin | Published: April 13, 2017 12:48 AM

उच्च न्यायालयाच्या फटकाऱ्यानंतर पोलिसांनी ध्वीप्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला आहे. नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी

मुंबई: उच्च न्यायालयाच्या फटकाऱ्यानंतर पोलिसांनी ध्वीप्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला आहे. नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी जानेवारी ते मार्च महिन्यात राज्यभरात एकूण १८५ केसेस नोंदवण्यात आल्या असल्याची माहिती राज्य सरकारने उच्च न्यायालयाला बुधवारी दिली. तसेच तक्रारीसाठी मुंबई व ठाणे पोलिसांनी प्रायोगिक तत्वावर ट्विटर अकाउंट सुरू केले असून मुंबई पोलिसांचे २७ लाख फॉलोअर असल्याची माहितीही सरकारी वकिलांनी उच्च न्यायालयाला दिली.बुधवारच्या सुनावणीत राज्य सरकारने मार्च महिन्यात नागरिकांनी केलेल्या तक्रारीची व कारवाईची आकडेवारी न्या. अभय ओक व न्या. ए. के. मेनन यांच्या खंडपीठापुढे सादर केली. जानेवारी ते मार्च या काळात राज्यभरातून एकूण २४३३ तक्रारी नोंदवण्यात आल्या. त्यापैकी २३८८ ठिकाणी पोलीस ध्वनीमापक यंत्रे घेऊन पोहचले. २००६ तक्रारींमध्ये तथ्य आढळले नाही. तर ध्वनीप्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी १८५ केसेस नोंदवण्यात आल्या, अशी माहिती सरकारतर्फे ज्येष्ठ वकील आशुतोष कुंभकोणी यांनी खंडपीठाला दिली.त्यावर खंडपीठाने एवढ्या मोठ्या प्रमाणावर खोट्या तक्रारी दाखल करण्यात येतात का? अशी विचारणा कुंभकोणी यांच्याकडे केली. त्यावर कुंभकोणी यांनी पोलिसांना अनेक अडचणी येत असल्याचे खंडपीठाला सांगितले. (प्रतिनिधी)