ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 28 - मराठा आरक्षण आणि विविध मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाने ३० मे रोजी मुंबईतील आझाद मैदान ते मंत्रालय अशा धडक मोर्चाची हाक दिली आहे. या मोर्चाला मुंबईच्या डबेवाल्यांनी पाठिंबा घोषित केला आहे. शिवाय मोर्चा नंतरही मुख्यमंत्र्यांनी आरक्षणाचा निर्णय घेतला नाही, तर बेमुदत उपोषणात डबेवालेही सामील होणार आहेत.
मुंबई डबेवाले असोसिएशनचे प्रवक्ते सुभाष तळेकर म्हणाले की, मराठा आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चातर्फे धडक मोर्चा व बेमुदत उपोषणाची हाक दिलेली आहे. त्याला प्रतिसाद देत डबेवाल्यांनी मोर्चामध्ये सामील झाल्यानंतर एक दिवसीय उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याप्रमाणे डबेवाल्यांचे प्रतिनिधी म्हणून माझ्यासह अर्जुन सावंत, दशरथ केदारी, विठ्ठल सावंत, रामदास करवंदे, रोहिदास सावंत हे एक दिवसीय उपोषण करतील. मुंबईचे डबेवाले हे मावळ मराठा असून आरक्षणाच्या सुविधेअभावी डबेवाल्यांच्या मुलांना शिक्षण व नोकरीच्या पुरेशा संधी उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे मराठा आरक्षणासाठी निघणाऱ्या सर्व प्रामाणिक आंदोलनात मुंबईचे डबेवाले आघाडीवर असतील, अशी प्रतिक्रिया तळेकर यांनी लोकमतशीबोलताना दिली.मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक संभाजी पाटील म्हणाले की, मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत सरकार गंभीर नाही. त्यामुळे मंगळवारी, ३० मे रोजी दुपारी १२ वाजता मराठा समाज आझाद मैदान येथे जमा होईल. तिथून कोणत्याही परिस्थितीत मंत्रालयावर मोर्चा धडक देईल. त्यानंतर राज्यभरात होणाऱ्या सर्व आंदोलनांना सरकार जबाबदार असेल. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयकमोर्चा नंतर आझाद मैदानातच बेमुदत उपोषणास बसतील...............................डोंबिवलीत बाईक रॅलीने पाठिंबामराठा क्रांती मोर्चाबाबत जनजागृती होण्यासाठी महामोर्चाला पाठिंबा देण्यासाठी डोंबिवली येथे बाईक रॅलीचे आयोजन केल्याची माहिती मोर्चाचे समन्वयक संदीप जाधव यांनी दिली. जाधव म्हणाले की, राज्यात वेगवेगळ््या मार्गाने मराठा आरक्षणाबाबत जनजागृती केली जाईल. शिवाय टप्प्याटप्प्याने आंदोलनाची तीव्रता वाढवली जाईल. डोंबिवलीतील बाईक रॅलीला सकाळी ७ वाजतासुरू होईल. इंदिरा गांधी चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून बाईक रॅलीला सुरूवात होईल, असेही त्यांनी सांगितले.