पुणे : गेली ३०-३५ वर्षे नाट्य क्षेत्रात कार्यरत असलेले अभिनेते श्याम पोंक्षे (६४) यांचे आजारपणामुळे येथे निधन झाले. सायंकाळी वैैकुंठ स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा आणि विवाहित मुलगी असा परिवार आहे़ चिपळूणचा जन्म असलेले पोंक्षे यांचे कार्यकर्तृत्व मुंबईत बहरले. गेल्या काळात ते पुण्यात वास्तव्यासाठी आले होते. मुंबई मराठी साहित्य संघाच्या १९७८ मधील ‘पंडित आता तरी पुरे’ या नाटकातून त्यांचा व्यावसायिक नाटकात प्रवेश झाला़ ‘घरात हसरे तारे’ हे त्यांचे गाजलेले नाटक. लक्ष्मीकांत बेर्डे याच्या नाटकातून ते पुढे आले. टिळक आणि आगरकर या नाटकामधील आगरकर यांची भूमिका गाजली होती़ त्यांच्या पत्नी सीमा पोंक्षे याही अभिनेत्री आहेत़
अभिनेते श्याम पोंक्षे यांचे दीर्घ आजाराने निधन
By admin | Published: December 03, 2014 3:43 AM