शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
5
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
6
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
7
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
8
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
9
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
10
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
11
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
12
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
13
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
14
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
15
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
16
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
17
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
18
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
19
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
20
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश

अभिनेता सोनू सूदने घेतली शरद पवारांची भेट, चर्चेला उधाण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2021 11:29 AM

Actor Sonu Sood And NCP Chief Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची सोनू सूदने भेट घेतली आहे.

मुंबई - कोरोना लॉकडाऊननंतर आता अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) काही दिवसांपासून पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सोनू सूदने बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली आहे. शरद पवार आणि सोनू सूद यांच्या भेटीबद्दल सविस्तर माहिती समोर आलेली नाही. मात्र ही एक सदिच्छा भेट असल्याचं म्हटलं जात आहे. सोनू सूदचं निवासस्थान बेकायदा असल्याचं सांगत मुंबई महानगरपालिकेने त्याला नोटीस बजावली आहे. यानंतर आता सोनू सूदने शरद पवारांची भेट घेतल्याने चर्चेला उधाण आलं आहे. 

कंगना राणौत आणि मुंबई महानगरपालिका यांच्यात रंगलेल्या वादानंतर आता सोनू सूदविरुद्ध मुंबई महानगरपालिका असा वाद रंगण्याची चिन्हे दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी पालिकेने जुहू येथील सहा मजली रहिवासी इमारतीत कोणत्याही परवानगीशिवाय हॉटेल सुरू केल्याचा आरोप करताना सोनू सूदवर महाराष्ट्र राज्य शहर नियोजन कायद्याअंतर्गत बेकायदेशीर बदल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्याविरोधात सोनू सूदने मुंबईउच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणी 13 जानेवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. 

पालिकेने चार जानेवारी रोजी जुहू पोलीस ठाण्यात सोनू सूदविरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत म्हटलं होतं की, सोनू सूदने जुहू येथील शक्ती सागर रहिवासी इमारतीचं कोणत्याही परवानगीशिवाय हॉटेलमध्ये रूपांतर केले आहे. या जागेवर बेकायदेशीरपणे बांधकामात बदल करण्यात आला आहे. प्राधिकरणाची परवानगी घेतल्याशिवाय अशाप्रकारे कोणतेही अनधिकृत बदल करता येत नाहीत असं बीएमसीने सांगितले. सोनू सूदच्या वतीनं वकील डी पी सिंग यांनी मुंबईउच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यात त्यांनी कोणत्याही प्रकारचे अनधिकृत बांधकाम न केल्याचा दावा केला आहे.

सोनू सूदला मुंबई उच्च न्यायालयाने 13 जानेवारीपर्यंत दिला दिलासा  

सोनू सूदला पालिकेने ऑक्टोबरमध्ये नोटीस पाठवली होती, या नोटिशीविरोधात त्याने स्थानिक कोर्टात (सिव्हिल कोर्ट) धाव घेतली होती. सिव्हिल कोर्टाने सोनू सूदला 3 आठवड्यांची मुदत हायकोर्टात जाण्याची दिली होती. मुंबई उच्च न्यायालायने सूदला 13 जानेवारीपर्यंत कोणत्याही प्रकारे जबरदस्तीने होणाऱ्या कारवाईविरोधात संरक्षण दिले आहे.  

 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारSonu Soodसोनू सूदMaharashtraमहाराष्ट्रMumbai Municipal Corporationमुंबई महानगरपालिकाHigh Courtउच्च न्यायालय