प्रदीप भाकरे, अमरावतीअसहिष्णुतेविरोधातील लेखकांच्या पुरस्कार वापसीवर देशभरात संमिश्र प्रतिक्रिया उमटत असताना, राज्यातील शिक्षकांनीही शासनाविरोधात पुरस्कार वापसीचा विचार सुरू केला आहे. शिक्षण विभागाच्या अन्यायकारी धोरणाविरोधात आदर्श शिक्षकांनी पुरस्कार परत करावेत. त्यामुळे सरकारचे डोळे उघडतील, अशी शिक्षक संघटनांची अपेक्षा आहे.सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथील रमाकांत गटकळ यांनी तीन दिवसांपूर्वी आदर्श शिक्षक पुरस्कार गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे परत केला. शिक्षकांच्या आंदोलनाने व्यापक स्वरूप घेतले, तर राष्ट्रपती पुरस्कारही परत करून शिक्षकांचे प्रश्न राष्ट्रपतीपर्यंत पोहोचू शकतात, अशी या शिक्षकांची भूमिका आहे. सेमाडोह येथील प्रभारी मुख्याध्यापक विजय नकाशे यांचा पंचायतराज समितीने बळी घेतला. ३० किलो तांदूळ कमी आढळल्याचा ठपका ठेवून नकाशे यांना निलंबित करण्यात आले होते. नकाशे यांना हा अपमान सहन न झाल्याने, त्यांनी शाळेतच गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे शिक्षक संघटनांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)
आदर्श शिक्षकांची पुरस्कार वापसी?
By admin | Published: November 15, 2015 2:30 AM