मुंबई - आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजपा यांच्यातील युतीची औपचारिक घोषणा आज झाली. युतीच्या घोषणेबरोबरच दोन्ही पक्षांमधील जागावाटपाच्या फॉर्म्युल्याची घोषणाही झाली आहे. या फॉर्म्युल्यानुसार लोकसभा निवडणुकीत भाजपा 25 तर शिवसेना 23 जागांवर लढणार आहे. तर विधानसभेमंध्ये जागावाटपाचा 50-50 चा फॉर्म्युला दोन्ही पक्षांनी मान्य केला असून, मित्रपक्षांना ठरावीक जागा देऊन उर्वरित जागांचे दोन्ही पक्षांमध्ये निम्म्या निम्म्याने वाटप होणार आहे. लोकसभा निवडणूक 2019च्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. आघाडीचं जागावाटप ठरलं असतानाच शिवसेना-भाजपा युतीचे घोडेही आज गंगेत न्हाले आहे. त्याबरोबरच गेल्या काही दिवसांपासून व्यक्त करण्यात येत असलेल्या अंदाजाप्रमाणे लोकसभेसाठी भाजपा 25 आणि शिवसेना 23 असे जागावाटप ठरले आहे. विधानसभा निवडणुकीसाठी दोन्ही पक्ष प्रत्येकी 144 जागा लढवण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र आता या फॉर्म्युल्यात युतीतील मित्रपक्षांचाही समावेश झाला आहे. त्यानुसार मित्रपक्षांना काही जागा सोडून उर्वरीत जागांचे दोन्ही पक्षांमध्ये प्रत्येकी निम्म्याने वाटप होणार आहे.
युतीच्या घोषणेबरोबरच जागावाटपाचा फॉर्म्युलाही ठरला, दोन्ही पक्ष लढवणार एवढ्या जागा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2019 8:17 PM
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजपा यांच्यातील युतीची औपचारिक घोषणा आज झाली. युतीच्या घोषणेबरोबरच दोन्ही पक्षांमधील जागावाटपाच्या फॉर्म्युल्याची घोषणाही झाली आहे.
ठळक मुद्देआगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजपा यांच्यातील युतीची औपचारिक घोषणा आज झालीयुतीच्या घोषणेबरोबरच दोन्ही पक्षांमधील जागावाटपाच्या फॉर्म्युल्याची घोषणाही झाली या फॉर्म्युल्यानुसार लोकसभा निवडणुकीत भाजपा 25 तर शिवसेना 23 जागांवर लढणार आहे. तर विधानसभेमंध्ये जागावाटपाचा 50-50 चा फॉर्म्युला दोन्ही पक्षांनी मान्य केला