शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
3
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
4
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
5
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
6
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
7
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
8
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
9
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
10
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
11
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
12
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
13
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
14
"महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता मत विकणार नाही’’, जयंत पाटील यांचा भाजपाला टोला   
15
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'अखेर भ्रष्टयुतीचा कारभार उघडा पडला, विनोद तावडेंवर कारवाई झाली पाहिजे'; नाना पटोलेंची मागणी
17
आईवरील उपचार थांबवून त्यांनी...; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर मोठा आरोप
18
घसरत्या बाजारात कुठे गुंतवणूक कराताहेत Mutual Fund हाऊस, कोणते आहेत ३ महिन्यांतील टॉप शेअर्स?
19
एक विवाह ऐसा भी! ११ रोपं आणि १ रुपया घेऊन नवरदेवाने बांधली लग्नगाठ; म्हणाला...
20
गौरी महालक्ष्मी योग: ७ राशींना भरपूर लाभ, शेअर बाजारातून नफा; उत्पन्न वाढेल, सुख-वैभव काळ!

अतिरिक्त आयुक्त वादाच्या भोवऱ्यात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2017 3:23 AM

केडीएमसीचे अतिरिक्त आयुक्त संजय घरत वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे.

कल्याण : दरवर्षी सादर केल्या जाणाऱ्या विवरणपत्रात पत्नीच्या नावे असलेली मालमत्ता त्यात नमूद न करता ती दडवल्याप्रकरणी केडीएमसीचे अतिरिक्त आयुक्त संजय घरत वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे. या प्रकरणी दाखल झालेल्या तक्रारीवर सरकारच्या नगरविकास विभागाने केडीएमसीला अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यावर योग्य माहिती न दिल्याने घरत यांच्या मालमत्तेसंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत सखोल चौकशी करणे उचित होईल, असा अहवाल महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाने सरकारला दिला आहे. त्यामुळे अतिरिक्त आयुक्तांच्या पाठीमागे चौकशीचा ससेमिरा लागण्याची चिन्हे आहेत. २ जून २०१४ च्या सरकार निर्णयानुसार वर्ग-४ वगळता सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना दरवर्षी मालमत्ता विवरणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. मात्र, घरत यांच्या पत्नी स्नेहल यांच्या नावे असलेल्या जमिनी आणि रिसॉर्ट कंपनीचा उल्लेख त्यांच्या मालमत्ता विवरणपत्रात नाही, अशी तक्रार तक्रार कल्याणमधील जागरुक नागरीक सुलेख डोण यांनी १९ जुलै २०१६ ला महापालिकेचे आयुक्त ई. रवींद्रन यांच्याकडे केली होती. त्यानुसार घरत यांनी सादर केलेले २०१३-१४ व २०१४-१५ या आर्थिक वर्षाचे मालमत्ता व दायित्व विवरणपत्राचे सीलबंद लखोटे ३० आॅगस्टला व्हीडीओग्राफीद्वारे आयुक्तांच्या प्रमुख उपस्थितीत उघडण्यात आले. या लखोट्यात १३-१४ व १४ -१५ या वित्तीय वर्षाची आयकर विवरणपत्रे आढळली. आयकर विवरणपत्रे ही मालमत्ता दायित्व विवरणपत्रे नसल्याने घरत यांना यासंदर्भात १९ सप्टेंबरला नोटीस बजावण्यात आली. त्यानुसार त्यांनी संबंधित वर्षाची सुधारित मालमत्ता व दायित्व विवरणपत्रे व १५-१६ या वित्तीय वर्षांची नियमित मालमत्ता व दायित्व विवरणपत्रे बंद लखोट्यात सादर केली होती. दरम्यान, डोण यांनी २२ नोव्हेंबरला सरकारच्या नगरविकास विभागाकडे तक्रार करत कारवाईची मागणी केली. त्यावर सरकारने महापालिकेला मुद्येनिहाय सविस्तर अहवाल अभिप्रायासह विनाविलंब सादर करा, असे आदेश दिले होते. डोण यांच्या तक्रारीत तथ्य आहे का, याची खात्री करून घेण्यासाठी घरत यांनी निवेदन सादर करावे, असे पत्र त्यांच्या कार्यालयात आणि निवासस्थानी पाठवले होते. मात्र त्यांनी पत्रे स्वीकारली नाहीत, असे सामान्य प्रशासन विभागाने सरकारला पाठवलेल्या अहवालात म्हंटले आहे. दरम्यान, यासंदर्भात घरत यांच्याशी संपर्क साधला असता ते बैठकीत व्यस्त असल्याचे त्यांच्या कार्यालयातून सांगण्यात आले.घरत यांच्यावर कुठली कारवाई होते याकडे पालिकेतील सर्वांचे लक्ष लागलेले आहे. (प्रतिनिधी) >तक्रारदाराने दिले पुरावेतक्रारदार डोण यांनी संबंधित मालमत्तांबाबत सातबाराच्या उताऱ्यासह पुरावे दिले असताना घरत यांनी सादर केलेल्या तिन्ही वर्षांच्या मालमत्ता व दायित्व विवरणपत्रांमध्ये तक्रारीत नमूद केलेल्या मालमत्तांचा कोठेही उल्लेख केलेला नाही.त्यामुळे घरत यांच्या मालमत्तेसंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी करणे उचित होईल, असा अभिप्राय महापालिकेने सरकारला पाठवलेल्या अहवालात दिला आहे.