नाशिक : नवीन शर्तीच्या जमीन व्यवहारात तरतुदींचा भंग केल्याचे सांगत प्रकरण मिटविण्यासाठी जमीन मालकाकडे ३५ लाख रुपयांची मागणी करणारे मालेगावचे अपर जिल्हाधिकारी रामचंद्र पवार यांची कसून चौकशी सुरू आहे. पवार यांना गुरुवारी अटक करण्यात आली आहे. लाच प्रकरणी पवार यांना मदत करणारा दिनेशभाई पंचासरा यालाही अटक करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चौकशीत पवार यांच्याकडे ५८़५ तोळे सोने, नाशिकमध्ये फ्लॅट, शहराजवळ विंचूर दळवी येथे १३ एकर शेतजमीन, नगरमधील श्रीगोंदा येथे दोन हजार स्क्वेअर फुटांचा बंगला व नाशिकच्या म्हसरूळ शिवारात रामेश्वरनगरमध्ये तीन मजली इमारतीचे बांधकाम सुरू असल्याची माहिती समोर आली आहे़ पवार यांच्या कोठडीची मुदत रविवारी संपणार असल्याने त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे़पवार यांनी दिनेशभाई पंचासरामार्फत नोटीस बजावलेल्या व्यक्तीकडे आधी ५० लाखांची व तडजोडीनंतर ३५ लाख रुपये लाचेची मागणी केली होती़ दोघांना शुक्रवारी जिल्हा व सत्र न्यायाधीश एऩ के.ब्रह्मे यांच्या न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली होती़ (प्रतिनिधी)
अपर जिल्हाधिकाऱ्यांची कसून चौकशी होणार
By admin | Published: August 09, 2015 2:12 AM