राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी बंडखोर आमदारांच्या कुटुंबियांना सुरक्षा देण्यसाबाबत मुंबई पोलीस आयुक्त आणि राज्याचे पोलीस महासंचालक यांना पत्र दिले असून बंडखोर आमदारांची सुरक्षा काढून घेतलेली नाही असे वळसे पाटील यांनी स्पष्ट केले आहे. गुवाहाटीला गेलेल्या सर्व आमदारांच्या कार्यालयात आणि निवासस्थानी पुरेशी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे, असे वळसे पाटील यांनी सांगितले.
एकनाथ शिंदे यांच्या बंडावर राज्याचील राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे, यादरम्या बंडखोर आमदारांच्या विरोधात राज्यात निदर्शने करण्यात आली, काही आमदारांच्या कार्यालयांची तोडफोड देखील करण्यात आली. त्यानंतर बंडखोर आमदारांच्या सुरक्षेचा निर्माण झाला होता. यानंतर बंडखोर आमदारांनी महाराष्ट्र सरकारकडे स्वत:च्या आणि कुटुंबीयांच्या सुरक्षेची मागणी केली होती. त्यानंतर बंडखोर आमदारांच्या निवासस्थानी राज्य सरकारच्या गृह विभागाने हाय अलर्ट जारी केला ससून केंद्र सरकारकडून वाय प्लस सुरक्षा आमदारांच्या कुटुंबियांना पुरविण्यात आली आहे.
दरम्यान राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी देखील ट्वीट करत याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, राज्यात आज कायदा व सुव्यवस्थेची कोणतीही मोठी अनुचित घटना घडलेली नाही. गुवाहाटीला गेलेल्या सर्व आमदारांच्या कार्यालयात आणि निवासस्थानी पुरेशी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. तसेच वळसे यांनी गुवाहाटीला गेलेल्या आमदारांची सुरक्षा कोणत्याही क्षणी काढून घेण्यात आली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.