शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

‘आदित्य’हट्टाची किंमत २ हजार कोटी!

By admin | Published: July 16, 2015 1:51 AM

राज्यातील इयत्ता सहावी ते दहावीच्या सुमारे ७५ लाख विद्यार्थ्यांना प्रत्येकी ३ हजार रुपये किमतीचे टॅब देण्याची युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची मागणी मंजूर करायची

मुंबई : राज्यातील इयत्ता सहावी ते दहावीच्या सुमारे ७५ लाख विद्यार्थ्यांना प्रत्येकी ३ हजार रुपये किमतीचे टॅब देण्याची युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची मागणी मंजूर करायची तर राज्याच्या तिजोरीवर २ हजार २२५ कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. आदित्य यांनी बुधवारी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची भेट घेऊन राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना टॅब देण्याची मागणी केली. शिवसेनेने आपल्या वचननाम्यात विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्याचे आश्वासन दिले होते. त्याच्या पूर्ततेचे पहिले पाऊल म्हणून शिवसेनेने दादरच्या बालमोहन विद्यामंदिरातील विद्यार्थ्यांना मोफत टॅबचे वाटप केले. आता राज्यातील १ कोटी ८५ लाख विद्यार्थ्यांपैकी सहावी ते दहावीच्या ७५ लाख विद्यार्थ्यांना मोफत टॅब देण्याची मागणी ठाकरे यांनी शिक्षणमंत्री तावडे यांच्याकडे केली. याबाबत तावडे यांना विचारले असता ते म्हणाले की, विद्यार्थ्यांना टॅब देणे याकडे केवळ दप्तराचे वजन कमी करणे एवढ्या मर्यादित हेतूने पाहत नाही. टॅब हा ई-लर्निंगचा पुढचा टप्पा आहे. बालभारती व पाठ्यपुस्तके ई-स्वरूपात उपलब्ध करून देण्याकरिता शिक्षण विभागाने डॉ. अनिल काकोडकर यांच्या समितीची यापूर्वीच नियुक्ती केली. शिक्षण सचिवांना यापूर्वीच टॅबची निर्मिती करणाऱ्या तीन-चार कंपन्यांनी सादरीकरण केले आहे. सध्या पाठ्यपुस्तके छपाईकरिता शिक्षण विभागाला दरवर्षी २५० कोटी रुपये खर्च येतो. विद्यार्थ्यांना दिले जाणारे टॅब पाच वर्षे वापरायोग्य राहणार असतील तर सर्व पाठ्यपुस्तके व बालभारती त्यामध्ये देणे शक्य आहे. तावडेंनी टॅब देण्यास नकार दिला नसला तरी किंमत व विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता कोट्यवधींचा बोजा आहे हे शिक्षण विभागाचे अधिकारी मान्य करतात. (विशेष प्रतिनिधी)