ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १५ - युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी शनिवारी केजी टू पीजी मोर्चा काढून युती सरकारवर टीका केली. विद्यार्थ्यांच्या विविध शैक्षणिक प्रश्नांवर बोलताना त्यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडेंसह सरकारवर टीका केली.
आधीच सरकार आणि आताच सरकार यामध्ये काहीच फरक वाटत नाही अशा बोच-या शब्दात त्यांनी टीका केली. राज्याच्या शिक्षण मंत्र्यांची भेट घेतली तेव्हा त्यांनी प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले होते. पण कुठलाही प्रश्न मार्गी लागला नाही अशी टीका आदित्यने केली. आदित्य ठाकरेंनी सरकारवर टीका केली असली तरी, त्यामध्ये शिवसेनेचाही सहभाग आहे.
आदित्य ठाकरेंच्या भाषणातील मुद्दे
मुलांना शाळेत प्रवेश देताना त्यांच्या पालकांच्या मुलाखती का घेतल्या जातात ?, केजी प्रवेशाचा कायदा कधी होणार ?
फक्त डिजीटल इंडियाच्या घोषणा नको, दप्तराचे ओझे कधी कमी होणार.
नवी सरकार आले पण अपेक्षित बदल झाले नाहीत.