मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यानंतर आता पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. तसे पत्रकही त्यांनी फेसबुकवर पोस्ट केले आहे. आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस 13 जूनला (शनिवार) तर राज ठाकरे यांचा वाढदिवस 14 जूनला असतो. यो दोघांनीही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
आदित्य ठाकरे यांनी पत्रकात म्हटले आहे, "आज आपल्या महाराष्ट्र राज्यावरच नव्हे तर संपूर्ण जगावर कोरोनाचे संकट आहे. गेले 2-3 महिने आपण सगळे एकत्रितपणे या संकटाविरुध्द लढत आहोत आणि हा लढा देत असताना आपले सर्वांचे एकच ध्येय आहे . ते म्हणजे कोरोनावर मात करणे. 13 जूनला माझा वाढदिवस आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मी माझा वाढदिवस साजरा न करण्याचे ठरवले आहे. माझ्या वाढदिवसानिमित्त तुम्ही जिथे असाल , तिथूनच मला आशीर्वाद व शुभेच्छा द्या."
बलुचिस्तानात हिंसक आंदोलन भडकलं, पाक सैन्य शेपटी वर करून चौक्या सोडून पळालं
"माझी तमाम शिवसैनिक , मित्रमंडळी आणि सर्वांना विनंती आहे की होर्डिज, हार तुरे, केक हा खर्च टाकून तो खर्च तुम्ही कोरोनाच्या संकटात अडकलेल्या लोकांवर खर्च करा अथवा मुख्यमंत्री सहाय्यता निधीला द्या. माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने हे एक सत्कार्य होईल आणि याचा मला निश्चितच आनंद होईल. प्रशासनाने सांगितलेल्या नियमांचे पालन करून आपण प्रशासनाला सहकार्य करूया. तुम्ही सर्वजण कोरोनापासून स्वत:ची काळजी घ्या, हीच माझ्यासाठी वाढदिवसाची खरी भेट असेल," असेही आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.
CoronaVirus News: आश्चर्य! कोरोना व्हायरस अँटीबॉडीजसह बाळाचा जन्म, डॉक्टर हैराण; रुग्णालय म्हणते...
दिलासादायक! कोरोना होतोय हद्दपार; 'या' 26 देशांमध्ये आता एकही रुग्ण नाही
राज ठाकरेंचं मनसैनिकांना आवाहन -येत्या 14 तारखेला माझ्या वाढदिवशी तुम्ही नेहमी मला शुभेच्छा देण्यासाठी येता. पण यंदाची परिस्थिती वेगळी आहे. कोरोनामुळे अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. कोरोनाबाधिताची संखा कमी झालेली नाही, थोडक्यात सगळीकडे चिंतेचे वातावरण आहे. अशा वातावरणात वाढदिवस साजरा करणे उचित नाही. म्हणूनच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना सूचनावजा आदेश देत आहे. कोणीही मला शुभेच्छा द्यायला येऊ नका, आहात तिथेच रहा आणि लोकांना मदत करा. हीच माझ्या वाढदिवसाची शुभेच्छा असेल. हे करत असताना तुम्ही तुमच्या कुटुंबाचीही काळजी घ्या. तुमच्या जीवापेक्षा मला काहीच मोलाचे नाही, असे राज यांनी म्हटले आहे.
दिलासादायक : जगातल्या 'या' पहिल्या शहरात 'हर्ड इम्यूनिटी'नं होतोय कोरोनाचा खात्मा! पण...