धुळे - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्रात जनआशीर्वाद यात्रा काढली. शिवसेनेला लोकसभा निवडणुकीत मतदान केल्याबद्दल आदित्य ठाकरे जनतेचे आभार मानत आहेत. तसेच विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला मतदान करण्याचे आवाहन करत आहेत. आदित्य ठाकरे यांना शिवसेनेकडून भावी मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट करण्यात येत आहेत. यावर आदित्य ठाकरे यांनी देखील सूचक प्रतिक्रिया दिली.
आदित्य ठाकरे यांच्या जन आशीर्वाद यात्रेला गुरुवारपासून सुरुवात झाली. ते आज धुळ्यात आहेत. यावेळी आदित्य यांनी माध्यमांशी संवाद साधला. शिवसेना आणि भाजप यांच्यात सगळ समसमान असले, असं सांगण्यात येते. यावर आपले मत काय असं विचारला असता, आदित्य ठाकरे म्हणाले, आमित शाह आणि उद्धव साहेबांच ठरल आहे. त्यावर मी भाष्य करणे योग्य नाही.
दरम्यान शिवसेनेकडे मुख्यमंत्रीपद आल्यास आदित्य ठाकरेच मुख्यमंत्री असं खासदार संजय राऊत यांनी म्हटले होते. त्या दृष्टीने शिवसेनेकडून प्रयत्न सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर, तुम्ही मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार आहात का, असा प्रश्न आदित्य यांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, मी मुख्यमंत्री होणार की नाही, जनतेने ठरवायचे आहे. मुख्यमंत्री पदासंदर्भात शिवसेना आणि भाजपच संगळ ठरल आहे. तसेच आपण पद मिळविण्यासाठी जन आशीर्वाद यात्रा काढली नसल्याचे आदित्य यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडे आल्यास आदित्य ठाकरेच मुख्यमंत्री राहतील. भाजप आणि शिवसेना यांच्या मुख्यमंत्रीपदावरून ठरलं आहे. आदित्य ठाकरे यांच्यात नेतृत्व गुण आहेत. राज्यातील जनतेची आणि पक्षाची इच्छा आहे की, आदित्य मुख्यमंत्री व्हावे, असंही संजय राऊत म्हणाले होते.