शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

आदिवासींना मिळतो गवतविक्रीतून रोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2016 3:04 AM

तालुक्यातील ग्रामीण भागात आदिवासींना सध्या गवतविक्रीच्या रूपाने रोजगार लाभला आहे.

विक्रमगड : तालुक्यातील ग्रामीण भागात आदिवासींना सध्या गवतविक्रीच्या रूपाने रोजगार लाभला आहे. त्यामुळे बुडत्याला गवताच्या काडीचा आधार, ही म्हण त्यांच्या बाबतीत खरी ठरत आहे. तालुक्यातील खेडोपाडी दिवाळी सणाआधी गवत खरेदीविक्रीचा व्यवसाय तेजीत आहे. वर्षभर रोजगारासाठी स्थलातंरित होणाऱ्या या शेतकऱ्यांना रोजगार मिळत असला तरी व्यापारी त्यांची मोठी लूट करीत असल्याचे वास्तव खरेदीविक्रीच्या व्यवहारावरून दिसून येत आहे.पावसाळ्यात माळरानावर, जंगलात नैसर्गिकरीत्या उगवणारे गवत विकून काही अंशी आदिवासी पाड्यात रोजगार उपलब्ध होऊ लागला आहे. भाद्रपद महिना म्हणजे ग्रामीण भागात हलाखीचा असल्याने व या महिन्यात गौरी-गणपती व नंतर पुढे दसरा-दिवाळी हे सण येत असल्याने सर्वांनाच पैशांची चणचण भासत असते. मात्र, या दिवसांत सर्व संकटांवर मात करून सोन्याचे दिवस दाखवणारा गवताचा व्यवसाय तंगीत सापडलेल्या आदिवासीबांधवांना मोठा आधार ठरतो. माळरानातील गवताचे भारे बांधून विकण्याचा व्यवसाय तालुक्यातील दादडे, केव, महासरोली, साखरा, उपराले, आलोन्डा, या परिसरात मोठ्या प्रमाणात सुरू झाला आहे. (वार्ताहर)>अशी होते फसवणूकया व्यवसायात गवताच्या लहान ४ जुड्यांची १ धडी व प्रत्येक धडीला ४ ते ५ रुपये गवत कापणाऱ्यास तर जागामालकास ५ रुपये मिळतात. मजुरांना या गवतकापणीचे दिवसभरातून केवळ १०० ते १२० रुपये मिळतात. तर जागा असलेल्या मालकाला क्विंटलमागे केवळ ७० ते ८० पर्यंत मिळतात. मात्र, व्यापारी क्विंटलमागे अंदाजे ५०० ते ७०० रुपये मिळवतो. त्यामुळे या व्यवसायात व्यापाऱ्याचाच फायदा जास्त आसल्याचे शेतकऱ्यांकडून बोलले जाते. सध्याचा काळात गवताने भरलेले ट्रकचा ट्रक मुंबईच्या दिशेने जाताना पाहावयास मिळत आहेत. खरेदी केलेल्या गवताला मुंबई, वसई, विरार, नालसोपारा, बोरिवली, भिवंडी, येथील गायीम्हशींच्या गोठ्यांमध्ये मोठी मागणी असल्याने हा व्यवसाय दिवसेंदिवस तेजीत आहे.