शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
2
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
3
"महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता मत विकणार नाही’’, जयंत पाटील यांचा भाजपाला टोला   
4
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'अखेर भ्रष्टयुतीचा कारभार उघडा पडला, विनोद तावडेंवर कारवाई झाली पाहिजे'; नाना पटोलेंची मागणी
6
Vinod Tawde: बविआने पैसे वाटताना पकडले? विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया...
7
आईवरील उपचार थांबवून त्यांनी...; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर मोठा आरोप
8
Vinod Tawde News "मला भाजपवाल्यांनीच सांगितले की ते..."; विनोद तावडेंनी पैसे वाटल्याच्या आरोपांवर ठाकुरांचा मोठा दावा
9
घसरत्या बाजारात कुठे गुंतवणूक कराताहेत Mutual Fund हाऊस, कोणते आहेत ३ महिन्यांतील टॉप शेअर्स?
10
एक विवाह ऐसा भी! ११ रोपं आणि १ रुपया घेऊन नवरदेवाने बांधली लग्नगाठ; म्हणाला...
11
गौरी महालक्ष्मी योग: ७ राशींना भरपूर लाभ, शेअर बाजारातून नफा; उत्पन्न वाढेल, सुख-वैभव काळ!
12
अमेरिकेत संक्रमित गाजर खाल्ल्याने एका व्यक्तीचा मृत्यू, अनेक जण आजारी; १८ राज्यांमधून परत मागवले
13
Vinod Tawde विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा बविआचा आरोप, विरारमध्ये मोठा राडा; भाजपा म्हणते, ही तर स्टंटबाजी
14
महाराष्ट्र, झारखंडमध्ये फलोदी सट्टाबाजाराचा मूड काय? मविआ की महायुती...
15
"कुठे आहेत निष्पक्ष निवडणुका?"; अंबादास दानवेंनी समोर आणला पैसे वाटपाचा VIDEO
16
स्पेस स्टेशनमध्ये सुनीता विल्यम्सची तब्येत बिघडली, वजन कमी होत आहे? स्वत: दिली माहिती
17
Gold Silver Rates Today : लग्नसराईच्या हंगामादरम्यान सोन्या-चांदीच्या दरात तेजी, पटापट चेक करा आजचे नवे दर
18
मतदारांना लागणार चंदनाचा टिळा अन् मिळणार तुळशीचे रोप; पनवेल ठरणार लोकशाहीच्या उत्सवाचे मॉडेल
19
"महाविकास आघाडीचा खोटं बोलून सत्तेत यायचा प्रयत्न"; धनंजय मुंडेंचं टीकास्त्र
20
Vidhan Sabha election: महाराष्ट्रात प्रत्येक विधानसभेला किती पक्ष रिंगणात?

"स्वाभिमान"मुळे अडला नारायण राणेंचा भाजपाप्रवेश?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2017 4:14 PM

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री नारायण राणे भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू असली...

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 9 - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री नारायण राणे भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू असली तरी अद्याप त्यांचा याबाबत अंतिम निर्णय झालेला नाही. त्यांच्या भाजपाप्रवेशाबाबाच चर्चांना अजूनही पूर्णविराम मिळालेला नाही. दिव्य मराठीच्या वृत्तानुसार राणेंचा भाजपाप्रवेश स्वाभिमान संघटनामुळे रखडला आहे. राणेंचे पुत्र आमदार नितेश यांची स्वाभिमान संघटना बरखास्त केली तरच राणे व त्यांच्या पुत्रांना पक्षप्रवेश दिला जाईल, अशी एक अट भाजपने घातल्याचे वृत्त दिव्य मराठीने सुत्रांच्या हवाल्याने दिले आहे. मात्र, भाजपाने घातलेली ही अट राणेंना मान्य नाही. दुसरीकडे राणेंनीही आपले पुत्र माजी खासदार नीलेश यांना राज्यसभेची उमेदवारी आणि आमदार नितेश यांना राज्याच्या मंत्रिमंडळात संधी द्यावी, अशा मागण्या केल्या आहेत. या दोन्ही मागण्या भाजपने धुडकावून लावल्या आहेत. या अटी-शर्थींच्या वादातच राणेंचा भाजप प्रवेश लांबला आहे. काँग्रेसमध्ये अस्वस्थ असलेले नारायण राणे यांनी पुत्र नीलेश यांच्यासह गेल्या महिन्यात अहमदाबाद येथे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची भेट घेतल्याचे वृत्त होते. राणे यांनी या वृत्ताचे खंडण केले असले तरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राणे पितापुत्रांचे एका गाडीतील फोटो वृत्तवाहिन्यांवर झळकले आहेत. राणे यांनी विरोधकांनी काढलेल्या संघर्ष यात्रेत फक्त एका सभेला हजेरी लावली. होती. अधिवेशन काळातही त्यांनी भाजपावर टोकाची टीका केली नाही. पण दिल्लीत जाऊन मात्र त्यांनी राहूल गांधी यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्या विरुध्दच्या तक्रारींचा पाढा वाचला.काँग्रेससह राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे किमान १० आमदार भाजपात आणण्याची अट भाजपा नेतृत्वाने राणे यांना घातली असून, या अटीच्या पूर्ततेनंतरच त्यांना केंद्रात मंत्रीपद देण्याची तयारी दर्शविल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.