अकरावी प्रवेश : आज अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवसनागपूर : केंद्रीय प्रवेश समितीतर्फे राबविण्यात येत असलेल्या अकरावीच्या केंद्रीभूत प्रवेशप्रक्रियेअंतर्गत अर्ज दाखल करण्याची मंगळवारी अखेरची तारीख आहे. यंदा दहावीचा निकाल वाढल्यामुळे प्रवेशासाठी विद्यार्थ्यांसाठी एक-एक गुणदेखील महत्त्वाचा ठरणार आहे. जुलै महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात प्रवेशयादी जाहीर करण्यात होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.१७ जूनपासून अकरावीच्या प्रवेशप्रक्रियेला सुरुवात झाली होती. पहिल्याच दिवसापासून शहरातील निरनिराळ््या महाविद्यालयांत विद्यार्थ्यांची गर्दी दिसून आली. विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता अर्ज दाखल करण्याची मुदत वाढविण्यात आली. विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केल्यानंतर २५ तारखेपासून अर्जांची पडताळणी करण्यात येणार आहे. पडताळणी झाली की लागलीच प्रवेशयादी जाहीर करण्यात येईल. प्रवेशयादी जाहीर करण्याची नेमकी तारीख अद्याप ठरविण्यात आलेली नाही.सोमवारी २,७७९ अर्ज दाखलदरम्यान, अर्ज दाखल करण्यासाठी सोमवारीदेखील विद्यार्थ्यांची गर्दी झाली होती. २,७७९ विद्यार्थ्यांनी सोमवारी अर्ज दाखल केले. यात सर्वाधिक १,४५९ अर्ज हे विज्ञान (इंग्रजी) शाखेसाठी स्वीकृत करण्यात आले. द्विलक्षीचे ८६९ तर वाणिज्य शाखेचे ४०० अर्ज दाखल झाले. अर्जांची आकडेवारी मंगळवारीच स्पष्ट होऊ शकेल.(प्रतिनिधी)अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेला प्रारंभसोमवारपासून राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या प्रवेश प्रक्रियेस सुरुवात झाली. मात्र अपेक्षेच्या अगदी विरुद्ध पहिल्याच दिवशी या प्रवेश प्रक्रियेस म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. पहिल्या दिवशी ४०० च्या जवळपास अर्ज प्राप्त झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शहरातील काही महत्त्वाच्या ‘एआरसी’वर (अप्लिकेशन रिसिप्ट सेंटर) सकाळपासूनच विद्यार्थ्यांनी अर्ज भरण्यासाठी गर्दी केली होती. मात्र इतर ठिकाणी शुकशुकाटच दिसून आला. साधारणत: दोन दिवसात प्रवेश प्रक्रियेला वेग येईल, अशी आशा तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.विद्यार्थ्यांच्या हितालाच प्राधान्यकेंद्रीय प्रवेश समितीतर्फे विद्यार्थ्यांच्या हितालाच सर्वात जास्त प्राधान्य देण्यात आले आहे. त्यामुळेच विद्यार्थ्यांना मुदत वाढवून देण्यात आली. शिवाय विद्यार्थ्यांच्या मनातील शंका दूर करण्याचे कामदेखील महाविद्यालयांकडून करण्यात येत आहे. यंदा जास्त संख्येत प्रवेश असतानादेखील आतापर्यंत संपूर्ण प्रवेशप्रक्रिया सुरळीतपणेच पार पडली आहे असे डॉ.पटवे यांनी सांगितले. अर्जांची पडताळणी झाली की लगेच प्रवेशयादी जाहीर करण्यात येईल अशी माहिती केंद्रीय प्रवेश समितीचे सचिव व सहायक शिक्षण संचालक डॉ. एस.एन.पटवे यांनी दिली.
जुलैच्या पहिल्या आठवड्यात प्रवेश यादी?
By admin | Published: June 24, 2014 12:56 AM